कारागृह विभागातील सेवा ही अतिशय संवेदनशिल सेवा – सुहास वारके

Dilip KurhadePrisonMaharashtraCity30/06/2025127 Views

कारागृह विभागातील सेवा ही अतिशय संवेदनशिल सेवा – सुहास वारके

पुणे :  “प्रशिक्षणार्थीनी त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणाचा आपल्या कर्तव्य ठिकाणी चांगल्या पद्धतीने उपयोग करुन घ्यावा, कारागृह विभागातील सेवा ही अतिशय संवेदनशिल सेवा असली तरी आपण हाती घेतलेल्या कामावरील निष्ठा व ते काम सर्वोत्तम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न यामुळे कारागृह विभागाचे नाव व लौकिक उंचावणार आहे आणि आपले जिवनमान सुखावणारे असल्याचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह सुधारसेवा सुहास वारके यांनी सांगितले”.

दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा, पुणे येथे नवनियुक्त कारागृह शिपाई प्रशिक्षणार्थी तुकडी क्र. १२२ यांचा दिक्षांत संचलन सोहळयात वारके बोलत होते. या दिक्षांत संचलन समारोहत विशेष कारागृह महानिरीक्षक स्वाती साठे, मुंबई दक्षिण विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती . दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन वायचळ, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनिल ढमाळ, येरवडा खुले कारागृहाचे अधीक्षक अनिल खामकर व अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या अधिक्षक किर्ती चिंतामणी अधिकारी उपस्थित होते.


तुकडी क्र. १२२ मध्ये १९६ प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केलेले आहे. प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणार्थीची संख्या असुन त्यामध्ये ६३ महिला प्रशिक्षणार्थीचा सहभाग उल्लेखनीय आहे. दिक्षांत संचलन परेडचे नेतृत्व देखील महिला प्रशिक्षणार्थीनी केले. मुख्य कमांडर म्हणून महिला प्रशिक्षणार्थी कोयल भिवराज गौतम व सेकंड इन कमांडर पायल बाबाराव जाधव यांनी केले. आपल्या पाच महिन्यांच्या अथक परीश्रमाने आपल्या बरोबरीच्या प्रशिक्षणार्थीना मागे टाकुन सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी होणेचा बहुमान प्रशिक्षणार्थी कारागृह शिपाई निकिता साहेब माने हिने मिळविला. वर्ग अभ्यास परिक्षेत सर्व प्रथम निकिता साहेब माने, नेमबाजी परिक्षेत सर्व प्रथम शुभम केशवराव देहारे, मैदानी परिक्षेत सर्व प्रथम पंकज अनिल पुंड, कोयल भिवराज गौतम यांनी बाजी मारली .सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात संस्थेच्या कवायत मैदानावर पार पडला . यावेळी विजेत्या बक्षिसपात्र प्रशिक्षणार्थीचा प्रमुख पाहुणेंच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयाचे अति. अधीक्षक, एच.एस. मिंड. वरिष्ठ तुरुंग अधिकारी शैला वाघ, पी.टी. आय. पी. बी. उकरंडे, एन. आर. साबळे, परविन तडवी तसेच संस्थेतील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...