सातारा कारागृहात क्षयमुक्त भारत 

Dilip KurhadeCityPune30/05/2025176 Views

सातारा कारागृहात क्षयमुक्त भारत

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत सन 2025 पर्यंत क्षय मुक्त भारत करण्याचे केंद्र शासनाचे  धोरण आहे. त्या अनुषंगाने जिल्हा क्षयरोग केंद्र, साताराचे जिल्हा क्षयरोग अधिकारी  डॉ. सचिन पाटील यांच्या माध्यमातून तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय येथील इतर अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून तसेच अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, कारागृह उप महानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली  पर्यंत सलग 4 दिवस सदर “क्षयमुक्त भारत 2025 या शिबिराचे” आयोजन करण्यात आले.

या शिबिरामध्ये सातारा जिल्हा कारागृहामधील एकूण 15 महिला बंदी व 350 पुरुष बंदी यांची AI बेस डिजिटल एक्स-रे मशीनद्वारे क्षयरोग तपासणी करून सर्वांचे एक्स-रे काढण्यात आले. यानुसार ज्या बंदयांच्या एक्स-रेमध्ये काही दोष आढळून येतील त्यांचे उपचार तातडीने सुरू करण्यात येणार आहेत, असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर सचिन पाटील यांनी सांगितले.

Recent Comments

No comments to show.
Categories
Loading Next Post...
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...