स्पर्धा परीक्षा तयारीतून देशसेवेचे उद्दीष्ट साध्य करावे: धर्माधिकारी 

Dilip KurhadePuneCityEducation25/05/202555 Views

डीईएस पुणे युनिव्हर्सिटी’ आणि ‘चाणक्य मंडल परिवार’ यांच्यातर्फे आयोजन

स्पर्धा परीक्षा तयारीतून देशसेवेचे उद्दीष्ट साध्य करावे: धर्माधिकारी

पुणे:  स्पर्धा परीक्षा क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘डीईएस पुणे युनिव्हर्सिटी’ आणि ‘चाणक्य मंडल  परिवार’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्पर्धा परीक्षांद्वारे करिअर’ (युपीएससी,एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची ओळख) या विषयावरिल करिअर मार्गदर्शन मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

रविवार  या  मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.हा मेळावा फर्ग्युसन कॉलेजच्या अँफीथिएटरमध्ये आयोजित करण्यात आला होता.

या विशेष सत्रात माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक -संचालक अविनाश धर्माधिकारी, रोहिणी गुट्टे यांनी मार्गदर्शन केले.

 डीईएस पुणे युनिव्हर्सिटी’चे अध्यक्ष  रवींद्र आचार्य, गंगनाथ झा, डॉ.शीतल रुईकर, स्वप्नील मुंगळे व्यासपीठावर उपस्थित होते.युपीएससी,एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची ओळख,तयारीची पावले,अभ्यासाचे योग्य तंत्र आणि दिशा याविषयी सखोल माहिती देण्यात  आली.स्पर्धा परीक्षांची तयारी करताना ‘बीए सिव्हिल सर्व्हिसेस अँड पब्लिक पॉलिसी’ आणि ‘एमए पब्लिक पॉलिसी’ हे यूजीसी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम ‘डीईएस पुणे युनिव्हर्सिटी’ मध्ये ‘चाणक्य मंडल  परिवार’ च्या सहकार्याने  पूर्ण करता येतात.त्याचीही माहिती या मेळाव्यात दिली गेली.दहावी,बारावी,पदवी शिक्षण घेत असलेले तसेच स्पर्धा परीक्षांकडे वळण्याची इच्छा असलेले विद्यार्थी व पालक यांनी उपस्थित होते.

अविनाश धर्माधिकारी म्हणाले, ‘दर वर्षी १५ लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देण्याची तयारी करतात.स्पर्धा परीक्षा तयारी करताना मानवी जीवनातील सर्व क्षेत्रांचा अभ्यास करावा लागतो. जीवनाच्या यशाचा पाया स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासातून रचला जातो. आयुष्यभर या प्रचंड अभ्यासाचा उपयोग होतो.हा अभ्यास करताना आनंदाने केला पाहिजे आणि समृद्ध झाले पाहिजे.अधिकारातून येणारी सत्ता नीट वापरली पाहिजे.भ्रष्ट मार्गापासून दूर राहिले पाहिजे.आपण लोकसेवक आहोत, हे विसरता कामा नये.’

स्पर्धा परीक्षांची तयारी करताना ‘बीए सिव्हिल सर्व्हिसेस अँड पब्लिक पॉलिसी’ आणि ‘एमए पब्लिक पॉलिसी’ हे यूजीसी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम ‘डीईएस पुणे युनिव्हर्सिटी’ मध्ये ‘चाणक्य मंडल  परिवार’ च्या सहकार्याने  पूर्ण करता येतात, हेही महत्त्वपूर्ण आहे, असे त्यांनी सांगितले.

‘स्पर्धा परीक्षा मध्ये प्रत्येकाला करियर करता येईल असे नाही.विद्यार्थ्यांनी आवडत्या क्षेत्रात करियर करावे, त्यासाठी किमान डॉक्टरेटपर्यंत शिकावे. देशातील किमान एक प्रश्न निवडून संशोधन करावे. तो प्रश्न सोडविण्यात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि चाणक्य मंडल चा वारसा आणि ध्येय देशसेवा हेच आहे.बीए सिव्हिल सर्व्हिसेस अँड पब्लिक पॉलिसी’ आणि ‘एमए पब्लिक पॉलिसी’हे यूजीसी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम ही दोन्ही संस्थांची नवी सुरुवात असून त्यातून देशसेवेचे उद्दीष्ट साध्य होईल’, असेही ते म्हणाले.

रवी आचार्य म्हणाले,’ राष्ट्र निर्मिती मध्ये योगदान देण्याची संधी प्रशासकीय सेवांमध्ये मिळते. त्यासाठी विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन करण्यासाठी ‘डीईएस पुणे युनिव्हर्सिटी’ आणि ‘चाणक्य मंडल  परिवार’ या दोन संस्था एकत्र आल्या आहेत.रोहिणी गुट्टे यांनी स्पर्धा परीक्षेच्या वेगवेगळ्या टप्प्यात लागणाऱ्या कौशल्यांची ओळख करून दिली.मयुर  पाटील यांनी सूत्र संचालन केले.

Recent Comments

No comments to show.
Categories
Loading Next Post...
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...