असाध्य रोग असलेल्या कैद्यांची मुक्तता झाली तरी स्विकारण्यास कुटुंब नाही तयार

कारागृह भाग-५
असाध्य रोग असलेल्या कैद्यांची मुक्तता झाली तरी स्विकारण्यास कुटुंब नाही तयार
कारागृहात १२५० कैद्यांना गंभीर आजार ; कारागृहातच घेणार अखेरचा श्‍वास
लोकशाही राष्ट्रात न्यायव्यवस्था मजबूत आहे. याठिकाणी दोषीवर कारवाई होतेच. अनेकांना त्यांच्या कृत्याबद्दल नंतर पश्‍चाताप होता. तर अनेक कैद्यांना कारागृहात असाध्य रोगाने पछाडलेली असते. या ठिकाणी उपचारही चांगले होत नाही. ना सुटका होते अशी त्यांची अवस्था असते. कारागृह प्रशासन त्यांना वयोमानानुसार सोडावे, अशी मागणी न्यायालयात करते. त्यांची वयोमानानुसार सुटका झाली तरी कुटुंबातील नातेवाईक त्यांना स्वीकारण्यास तयार नसतात. त्यामुळे त्यांनी केलेल्या अपराधाची शिक्षा न्यायव्यवस्थाही देते आणि विधाताही देत असल्याचे वास्तव राज्यातील विविध कारागृहातील रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कैद्यांकडे पाहिल्यानंतर दिसते.

येरवडा : राज्यातील विविध कारागृहात साडेबाराशे पेक्षा अधिक कैदी गंभीर स्वरूपाच्या आजाराने ग्रस्त आहेत. यामध्ये सिद्धदोष कैद्यांची संख्या पाचशे असून न्यायाधीन कैद्यांची संख्या सातशे पेक्षा अधिक आहे. या कैद्यांना ब्रेन टयुमर, एचआयव्ही, कर्करोग, ह्र्दयासंबंधीचे आजार, क्षयरोग, कुष्टरोग आदी व्याधींनी ग्रासले आहेत. तर काहीजण कोमात आहेत. अशा कैद्यांचा अहवाल न्यायालयाला पाठवून किरकोळ गुन्हे असलेल्यांना मुक्तता करण्यासंदर्भात विचारणा करण्यात येणार येत असल्याची माहिती कारागृह प्रशासन करते.
राज्यातील विविध कारागृहांमध्ये सिध्ददोष आणि न्यायधीन कैद्यांची अधून-मधून आरोग्य तपासणी होत असते. यामध्ये अनेक कैद्यांना असाध्य रोग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये आठशे कैद्यांना हृदयरोग, २८६ जणांना एचआयव्ही, सव्वाशे कैदी मुत्राशयाच्या आजाराने ग्रस्त आहेत. सोळा जण कर्करोगाचा सामना करीत आहेत. सतराजण कुष्ठरोगाने पीडित आहेत. सहा जणांना ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे अचेतन अवस्थेत ते पडलेले आहेत.

राज्यातील मध्यवर्ती कारागृहात रुग्णालय असते. या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून ते मानसोपचारतज्ज्ञांपर्यंतचे डॉक्टर असतात. मात्र, या ठिकाणी कैद्यांना चांगले उपचार मिळतील याची खात्री नसते. असाध्य आजार झालेल्या कैद्यांना सरकारी रुग्णालयात पाठविले जाते. मात्र, तेथेही चांगले उपचार मिळतील याची शाश्‍वती नसते. त्यामुळे कैद्यांचा आजार बळावत जातो. त्यांच्यावर गंमीर गुन्हे असल्यामुळे त्यांना बाहेर सोडता ही येत नाही. सोडले तर त्यांना त्यांचे कुटुंब सुद्धा स्विकारतील याची शक्यता नसते. त्यामुळे असाध्यरोग असलेले कैदी असह्य वेदनेने कारागृहातच वास्तव्यास असतात. त्यांना बाहेर सोडण्यासाठी कारागृह प्रशासन उच्च न्यायालयाकडे मागणी केली आहे. त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. त्यामुळे अशा कैद्यांचा शेवटचा श्‍वास सुद्धा कारागृहातच घेतील असे कारागृहातील प्रशासनातील अधिकारी यांचे म्हणणे आहे.

राज्यातील पाचशे कैदी मानसिक आजारी
राज्यातील साधारणत: पाचशे कैदी मानसिक आजारी आहेत. ‘माणुस ’ समाजशील प्राणी आहे. त्यामुळे त्याला कुटुंब, नातेवाईक किंवा मित्र मंडळींपासून अर्थात समाजापासून दूर ठेवले तर त्याला मानसिक आजार होतो. राज्यातील अनेक कारागृहात गंमीर गुन्ह्यांच्या कैद्यांना अतिसुरक्षित अशा बराकीत ठेवले जाते. मध्यवर्ती कारागृहात अंडासेल आहे. या सेल मध्ये कैद्यांना एकट्याला राहावे लागते. त्यामुळे असे कैदी मानसिक आजारी होतात. त्यांना कारागृहातील मानसोपचार तज्ज्ञ  उपचार करतात. त्यांना नियमित औषधोपचार घ्यावे लागतात. संगीत ऐकणे, टीव्ही पाहणे, वृत्तपत्र, पुस्तके वाचणे आवश्‍यक असते. मात्र, अनेक कैदी असे पर्याय निवडत नाहीत. ते आपल्या बराकीत एकटेच पडून असतात. सतत विचार करीत असतात त्यामुळे त्यांना आजार बळावतो. त्यानंतर त्यांना मनोरुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते.

‘‘ कारागृहात प्रत्येक बराकी टीव्हीची सोय केलेली असते. यासह कारागृहात ‘येरवडा प्रिझन रेडिओ’ हे कम्युनिटी रेडिओ आहे. यावर कैदीच रेडिओ जॅकी असतात. ते रेडिओच्या माध्यमातून विविध कार्यक्रम सादर करीत असतात. कारागृहात मोठे सुसज्ज ग्रंथालय आहेत. यामध्ये विविध लेखकांची पुस्तके, मासिके, साप्ताहिके, वृत्तपत्रे आहेत. याचा कैदी पुरेपुर वापर करतात.’’
– वरिष्ठ तुंरूग अधिकारी, येरवडा मध्यवर्ती कारागृह 

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...