आंतरजातीय , आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांना पुण्यात ‘सेफ हाऊस ‘

Dilip KurhadePunereligiousSocialCityRural22/05/2025189 Views

सौजन्य चॅट जिपीटी प्रातिनिधिक चित्र
आंतरजातीय , आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांना पुण्यात ‘सेफ हाऊस ‘

‘विचारवेध असोसिएशन’ चा पुढाकार

पुणे : ‘विचारवेध असोसिएशन’च्या पुढाकाराने आंतरजातीय,आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या युवक युवतीना विवाहानंतर पुण्यात काही काळ सुरक्षित घर ( सेफ हाऊस) सुविधा विनामूल्य उपलब्ध केली असल्याची माहिती असोसिएशनने  पत्रकाद्वारे दिली.अधिक माहिती साठी अनिकेत साळवे  ८७९६४०५४२९  या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

आंतरजातीय,आंतरधर्मीय विवाह संकल्पनेला समाजातून पाठिंबा देण्यासाठी ‘विचारवेध असोसिएशन’ कार्यरत आहे. त्या दृष्टीने काही सुस्थित, प्रतिष्ठित कुटुंबांनी अशा जोडप्यांना विवाहानंतर दोन महिने आधार देण्याची तयारी दाखवली आहे. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने हा आधार विनामूल्य असेल.बाणेर,खडकी,बावधन,औंध,केशवनगर अशा ठिकाणी ही सेफ हाऊस उपलब्ध केली आहेत.

‘विचारवेध असोसिएशन’च्या पुढाकाराने आंतरजातीय,आंतरधर्मीय विवाह संकल्पनेला पाठिंबा देण्यासाठी नवे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.या उपक्रमांत इच्छुक युवक-युवतींसाठी समुपदेशन व मार्गदर्शन, आर्थिक सहाय्याचे सल्ला, जोडपे एकत्र आणण्यासाठी कार्यक्रम, व्याख्याने तसेच सुरक्षित निवासासाठी ‘सेफ हाऊस’ यांचा समावेश आहे. समाजात आंतरजातीय विवाहाबाबत असलेले गैरसमज दूर करून, विवाह करणाऱ्यांना आधार देण्याचा यामागचा मुख्य उद्देश आहे.

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...