पिंपरी मतदार संघात चलो वस्ती संपर्क अभियानाचे आयोजन

आमदार अमित गोरखे यांच्या उपस्थितीत पिंपरी विधान मतदार संघात चलो वस्ती संपर्क अभियानाचे आयोजन
 पिंपरी  मतदार संघात चलो वस्ती संपर्क अभियानाचे आयोजन*
 पिंपरी: भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे व कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात  26 एप्रिल व 27 एप्रिल या दिवशी ‘गांव /वस्ती संपर्क अभियान’  राबविण्याच्या बाबत पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र जी चव्हाण  यांच्या माध्यमातून देण्यात आल्या होत्या याप्रसंगी आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने चल वस्ती चलो संपर्क अभियान राबविण्यात आला असून दापोडी ,फुगेवाडी, कुंदननगर ,सिद्धार्थनगर ,संजय नगर गणेशनगर, सुंदरबाग कॉलनी, एसटी वर्कशॉप या भागामध्ये प्रामुख्याने या अभियान राबविण्यात आले.
यावेळी स्वच्छता अभियान देखील राबविण्यात आले तसेच
मतदार संघातील नागरिकांसोबत मन की बात  कार्यक्रम पाहिला असून  संपर्क अभियान अंतर्गत परिसरातील विठ्ठल मंदिर परिसरातील स्वच्छता केली प्रभागातील लाभार्थी नागरिकांची घरोघरी जाऊन भेट घेतली तसेच प्रभागांमध्ये राहत असलेले कारसेवक नंदकिशोर कणसे,  महेश शांताराम दाभोळकर,  दत्तात्रय गायकवाड, शशिकांत देशपांडे, दादासाहेब ढवाण,  जनाभाऊ पेडणेकर, व आणीबाणीतीलसुभाष बोधे या सर्व नागरिकांच्या घरी जाऊन भेट घेतली व त्यांचा सन्मान केला. तसेच प्रभागातील लाभार्थी संध्या जिजाऊ पवार व इतर नागरिकांच्या घरी भेट दिली.
 प्रभागात पदयात्रा देखील काढली व प्रभागातील प्रमुख व्यक्तींची संवाद देखील साधला यावेळी  संजय कणसे ,धर्मेंद्र क्षीरसागर ,विशाल वाळुंजकर ,सागर फुगे, रघुनाथ जवळकर , दीपाली कणसे ,  शशिकांत देशपांडे ,  राजु कानाडे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...