पूर्व पुण्याच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षपदी माजी आमदार सुनील टिंगरे यांची निवड

Dilip KurhadePuneCityPolitics01/06/2025263 Views

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे शहराचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष जाहीर

महापालिकेच्या निवडणुकीच्या पाश्वभूमीवर निवड ; टिंगरे यांचे वडगावशेरीतील प्राबल्य ठरणार निर्णायक

पुणे : पुणे शहराचे पूर्व पुणे यामध्ये कसबा कॅन्टोन्मेंट हडपसर व वडगाव शेरी मतदारसंघाचार
समावेश या चार मतदारसंघाला पूर्व पुणे म्हणून संबोधन पूर्व पुण्याच्या शहराध्यक्षपदी माजी आमदार सुनील टिंगरे यांची निवड तर कार्याध्यक्षपदी रूपाली ठोंबरे व हाजी फिरोज शेख यांची निवड करण्यात आली आहे .
पुणे शहराच्या पश्चिम पुण्यामध्ये पर्वती खडकवासला कोथरूड व शिवाजीनगर या चार विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
पश्चिम पुण्याच्या शहराध्यक्षपदी सुभाष जगताप यांची निवड तर कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख व अक्रूर कुदळे यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीची घोषणा रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली . या सर्वांची नियुक्तीपत्रे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेले आहेत. अजित पवार यांच्या सुचने प्रमाणे आमदार चेतन तुपे यांनी ही नावे जाहीर केली.
आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पाश्वभूमीवर हि निवड महत्वाची ठरणार आहे. वडगावशेरी मतदार संघात गेल्या वर्षी अवघ्या साडेचार हजार मतांनी सुनील टिंगरे यांचा पराभव झाला होता. त्यांचे मतदार संघात अजूनही प्राबल्य आहे. भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुती असताना टिंगरे यांना अनेक स्वकीयांनी मदत केलेली नव्हती. जे आता महापालिकेत नगरसेवक होण्याची स्वप्न बघत आहेत. त्यांचे स्वप्न टिंगरे भंग केल्याशिवाय राहिले तर नवलच म्हणावे लागेल. तर दुसऱ्या बाजूला पुढील विधान सभेसाठी टिंगरे आतापासुनच तयारीला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी महापालिकेतील सूत्रे अप्रत्यक्षपने वरील नेते हलवण्याची शक्यता अधिक आहे.

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...