बरे झालेल्या मनोरूग्णांनी अनुभवली मेट्रोची सहल

सौजन्य : चॅट जिपीटी प्रातिनिधिक चित्र
बरे झालेल्या मनोरूग्णांनी अनुभवली मेट्रोची सहल
 अनेक वर्षानंतर रुग्णालयातून बाहेर पडलेल्या रुग्णांनी बदललेले शहर पाहून झाले अव्वाक 
 पुणे : मनोरुग्णालयातील उपचारानंतरही त्यांचे नातेवाईक घरी घेऊन जात नाहीत. त्यामुळे त्यांचे वास्तव्य मनोरुग्णालयातच आहे. रूग्णालय हेच त्यांचे घर झाले आहे. अशा बरे झालेल्या ५४ महिला व पुरूष रूग्णांची सहल मेट्रो ट्रेन मध्ये आयोजित केली होती. मेट्रो ट्रेन मधील प्रवास रूग्णांच्या आनंदाला पारावर उरला नाही. मेट्रो ट्रेन मधून रूग्ण बदललेल्या शहराचे रूप न्याहाळत होते. रूग्णांच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह, जिज्ञासा, कुतूहल , भिती अशा विविध भावमुद्रा स्पष्ट दिसत होत्या. येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात दिर्घकालीन वास्तव्यास असलेले अनेक बरे झालेले रूग्ण आहेत. त्यांना त्यांचे नातेवाईक घरी घेऊन जात नाहीत. त्यामुळे त्यांचा मुक्काम रुग्णालयातच आहे. रूग्णाल हेच त्यांचे घर आहे. त्यामुळे सुट्टीत , सण व उत्सवात कोठेच त्यांचा प्रवास होत नाही. चार भिंती मध्येच त्यांचे विश्व समावलेले असते. त्यामुळे अशा बरे झालेल्या रुग्णांची सहल काढण्याची कल्पना उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते गणेश बाबर यांना सुचली. त्यानंतर अनेक नियम व अटींवर त्यांनी सहलीचा परवानगी दिली. ही रुग्णांची सहल दोन बस मधून जिल्हा न्यायलयाच्या मेट्रो स्थानकावर आली. यावेळी परिसर बघून एका रूग्णाने या ठिकाणी धान्य गोडाऊन असल्याची माहिती इतर रुग्णांना दिली. त्यानंतर महा मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी सर्व रूग्ण व कर्मचारी , डॅाक्टर व सोबत असलेल्यांचे तिकिटं काढून दिले. त्यानंतर त्यांना जिन्याने मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर घेऊन गेले. या प्रवासात रूग्ण कुतूहलाने सर्व परीस न्याहाळत होते. मेट्रोचा प्रवास पहिल्यांदाच असल्साने त्यांत्या चेहऱ्यावर आनंद, उत्सुकता, जिज्ञासा दिसत होते. तर काहींच्या चेहऱ्यावर निरागसपणा दिसत होता. मेट्रो मधील प्रवासात तर सर्वजण मेट्रोच्या काचेच्या खिडकीतून बदलले शहर न्याहाळताना दिसले. त्यांना दिसलेल्या इमारती, नदी, पूल , वाहने ते एकमेकांना दाखवत होते. हा प्रवास संपू नये असे त्यांना वाटत असताना मेट्रोचे रामवाडी स्थानक आले. सर्वांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. तेथून ते बसने एम्प्रेस गार्डन मध्ये गेले. तेथे दुपारचे जेवण केले. त्यानंतर रूग्णांनी नृत्य, विविध खोळाचा आनंद लुटला. त्यानंतर सर्वांनी फुलराणी मधून फेरफटका मारला. सहली बद्दल सर्वांनी आनंद व्यक्त करीत कुटुंबातील व्यक्तींपेक्षा काळजी घेतली व प्रेम दिल्याचे सांगत त्यांना आनंदाश्रू आवरतां आले नाही. सकाळी बसला माजी आमदार जगदिश मुळीक यांनी हिरवा झेंडा दाखवून सहलीची सुरवात केली. यावेळी रुग्णालयाचे अधिक्षक डॅा सुनिल पाटील ,गणेश बाबर, विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, उद्योजक सुभाष तालेरा, मंगेश गोळे उपस्थित होते. मनोरुग्णालयातील सहल यशस्वी करण्यासाठी गणेश बाबर, सुभाष तालेरा, मेट्रोचे संचालक डॅा हेमंत सोनवणे व कर्मचारी,

 रुग्णालयाचे अधीक्षक डॅा सुनिल पाटील, उपाधिक्षक डॉ श्रीनिवास कोलोड , समाजसेवा अधिक्षक भाऊसाहेब माने  , व्यवसाय उपचार तज्ज्ञ  विद्या सुर्यवंशी ,  अनिता मोरे मनोरुग्ण तज्ञ परिचारिका रुग्णालयातील डॅाक्टर , कर्मचाऱ्यांरी यांचे सहकार्य मिळाले .

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...