महापुरुषांनी विकासाचा मार्ग आखला -बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे

Dilip KurhadeSocial06/05/2025180 Views

महापुरुषांनी विकासाचा मार्ग आखला
— बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे

पुणे :कोल्हापूर संस्थानांचे राजे राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या राज्यातील उपेक्षित वंचित बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्वपूर्ण कार्य केले. अस्पृश्यतेचे उच्चाटन, सक्तीचे शिक्षण , शेती, उद्योग, कला, क्रीडा, आरोग्य क्षेत्राला शाहू महाराजांनी चालना दिली. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन मूकनायकला आर्थिक मदत केली महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी काम केल्यामुळेच त्यांना लोककल्याणकारी राजा म्हणून संबोधले जाते . महापुरुषांचे विचार आपण आचरणात आणावेत असे मत बार्टी संस्थेचे महासंचालक सुनिल  वारे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन प्रसंगी बोलताना व्यक्त केले .
डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथे दिनांक ६ मे २०२५ रोजी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस मा महासंचालक वारे  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी निबंधक  इंदिरा अस्वार, विभागप्रमुख  स्नेहल भोसले , वृषाली शिंदे , उमेश सोनवणे, दादासाहेब गिते, शुभांगी पाटिल यांनीही अभिवादन केले.
विभागप्रमुख उमेश  सोनवणे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याला उजाळा दिला.
यावेळी बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सुत्रसंचलन रामदास लोखंडे यांनी केले. आभार डॉ अंकुश गायकवाड यांनी मानले.

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...