महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे साजरा.

Dilip KurhadeMaharashtraPolitics01/05/2025738 Views

महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे साजरा.

महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे साजरा.

 

     पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन काँग्रेस भवन येथे साजरा करण्यात आला. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. अरविंद शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यानंतर सेवादलाचे वतीने राष्ट्रगीत व महाराष्ट्रावर आधारीत गीत सादर करण्यात आले.

     यावेळी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर यांनी आपले मनोगत व्‍यक्त केले ते म्हणाले की, ‘‘१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली व मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली. महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी संयुक्त महाराष्ट्र समितीने पुढाकार घेऊन आंदोलने केली. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना ६ फेब्रुवारी १९५६ रोजी कै. केशवरावजी जेधे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात स्थापना झाली. या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनास एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, श्रीपाद अमृत डांगे, पी. के. अत्रे, भाई उध्दवराव पाटील व अनेक नेत्यांनी भाग घेतला. या आंदोलनात १०६  जणांना आपला जीव गमवावा लागला व ते हुतात्मे झाले. ४ मे १८८६ रोजी शिकागोमध्ये कामगारांनी संप केला. त्या कामगारांची प्रमुख मागणी अशी होती की, कामगारांना त्यांच्या २४ तासांपैकी ८ तास काम, ८ तास विश्रांती व ८ तास करमवणूकीसाठी वेळ द्यावा. त्यांच्या या संपावर पोलीसांनी गोळीबार केला व चार कामगार मृत्यूमुखी पडले. जगभरात १ मे आंततरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.’’

     यावेळी माजी आमदार उल्हास पवार, दिप्ती चवधरी, गोपाळ तिवारी, रफिक शेख, लता राजगुरू, नीता रजपूत, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, सेवादलाचे प्रकाश पवार, बाळासाहेब अमराळे, नितीन परतानी, राज अंबिके, द. स. पोळेकर, समिर गांधी, सतिश पवार, संदिप मोकाटे, रमेश सोनकांबळे, संतोष पाटोळे, अनिल पवार, प्रदिप परदेशी, प्राची दुधाने, अर्चना शहा, अनिता धिमधिमे, ज्योती परदेशी, शाम काळे, दिपक ओव्‍हाळ, मनोहर गाडेकर, ॲड. नंदलाल धिवार, सुरेश नांगरे, सचिन भोसले, लतेंद्र भिंगारे, अनिल धिमधिमे, दिलीप लोळगे, वाल्मिक झालगे, आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...