येरवड्यात चोवीस लाख चौरस फुटाचा मेट्रो मॉल 

Dilip KurhadePune01/05/202591 Views

सौजन्य चाट जीपीटी मेट्रो मॉल
येरवड्यात चोवीस लाख चौरस फुटाचा मेट्रो मॉल 
‘मॉल’च्या भाड्यातून विविध इमारतींची देखभाल व दुरूस्ती
 पुणे ः विमानतळ रस्त्यावरील सर्व्हे क्रमांक १९१ येथे सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) व मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने चोवीस लाख चौरस फुटाचा मेट्रो मॉल होणार आहे. मॉलमधील जागा भाडेतत्वावर देण्यात येणार आहे. यातून मिळणारा पैसा हा या ठिकाणी होणाऱ्या फौजदारी न्यायालय, सेंट्रल बिल्डींग क्रमांक -२ व जामाबंदी आयुक्त कार्यालय ( सेटलमेंट कमिशनर) या इमारतींच्या देखभाल व दुरूस्तीसाठी वापरणार असल्याची माहिती पीडब्लुडीचे उप अभियंता अजय पाटील यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) अनेक सरकारी इमारती बांधते. या इमारती बांधून झाल्यावर त्यांची देखभाल व दुरूस्ती होतेच असे नाही. त्यामुळे काही वर्षांत अशा इमारतींची दुरावस्था होते.यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी ‘पीडब्ल्यूडी’ मेट्रोच्या सहकार्याने ‘मेट्रो’ मॉल उभारणार आहे. हा मॉल तब्बल २४ लाख चौरस फुटाचा असणार आहे. लोहगाव विमानतळा पासून अवघ्या काही मिनिट अंतरावरील असलेल्या मॉलच्या जागेला मोठी मागणी असणार आहे. त्यामुळे या मॉलच्या जागेच्या भाड्यातून वर्षाला काही कोटी रूपये मिळण्याची शक्यता आहे. या रकमेतून या परिसरात होणाऱ्या विविध सरकारी इमारतींची देखभाल व दुरूस्ती होणार आहे.  विमानतळ रस्त्यावरील बंगला क्रमांक पाच, सहा , सात व आठ हे ब्रिटिशकालीन बंगल्यांना शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. सध्या बंगला क्रमांक पाच मध्ये विभागीय उत्पादन शुल्क व विभागीय पुरातत्त्व विभागाचे कार्यालय आहे. बंगला क्रमांक सहा मध्ये जिल्हा हिवताप कार्यालय व भूमि अभिलेख कार्यालय (लॅंड ॲण्ड रेकॉर्ड) आहे बंगला क्रमांक सातमध्ये पुणे शहर वाहतूक विभागाचे कार्यालय आहे. तर बंगला क्रमांक आठ मध्ये काही सरकारी कार्यालय आहेत. हे चारही बंगले पाडण्यात येणार आहेत.  या बंगल्यांच्या जागी फौजदारी न्यायालय, सेंट्रल बिल्डींग क्रमांक-२ आणि जमाबंदी आयुक्त कार्यालय आणि जमाबंदी आयुक्तांचा बंगला आदींचे बांधकाम होणार आहे. या इमारतींच्या मागे २४ लाख चौरस फुटाचा मेट्रो मॉल बांधण्यात येणार आहे. फौजदारी न्यायालयाच्या ए व बी अशा दोन इमारती असणार आहेत. ए इमारतीमध्ये दोन तळमजले वाहनतळ तर सहा मजल्यावर २४ फौजदारी न्यायालयांचे कक्ष असणार आहेत. तर बी इमारतीमध्ये पहिल्या दोन मजल्यावर विविध स्टॉल्स असून सहा मजले चारचाकी व दुचाकीसांठी वाहनतळ असणार आहे. शेजारी सेंट्रल बिल्डिगं क्रमांक दोन असून या ठिकाणी शहरातील अनेक सरकारी कार्यालये या ठिकाणी येणार आहेत. तर राज्याचे जमाबंदी आयुक्तालय होणार असल्यामुळे दररोज हजारोंच्या संख्येने या ठिकाणी नागरिकांची वर्दळ होणार आहे. येरवडा मेट्रो स्टेशनपासून अवघ्या एक किलोमिटर अंतरावर हे कार्यालय आहे. त्यामुळे पुणे शहर व पिंपरी- चिंचवडसह जिल्ह्यातून या ठिकाणी नागरिकांना सहज येतान येणार आहे. कोट ‘‘ येरवड्यातील सर्व्हे क्रमांक १९१ वर फौजदारी न्यायालय, सेंट्रल बिल्डिंग क्रमांक दोन व जमाबंदी आयुक्तालयाच्या इमारतींचे बांधकामे होणार आहेत. त्याच्या मागे मेट्रोच्या माध्यमातून २४ लाख चौरस फुटाचे भव्य मॉल होणार आहे. या मॉलच्या भाड्यातून येथील विविध इमारतींचे देखभाल व दुरूस्ती होणार आहे.’’ – अजय पाटील, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग चौकट मेट्रो मॉलमुळे शेकडो जणांना रोजगार मिळणार  येरवडा व नगर रस्त्यावर अनेक देश व विदेशातील आयटी कंपन्या आहेत. त्यामुळे येथील तयार कार्यालयांना मोठी मागणी आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने मेट्रो मॉल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे या मॉलमध्ये अनेक देश व विदेशातील आउटलेंट उघडली जातील यात शंकाच नाही. त्यामुळे या परिसरात विविध सरकारी कार्यालयांमुळे व मॉलमुळे शेकडोजणांना रोजगार मिळेल यात शंकाच नाही.

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...