येरवड्यात तीन हजार ३५० रूग्ण क्षमतेचे पर्यावरणपूरक मनोरूग्णालय 

Dilip KurhadeHealth01/05/202560 Views

येरवड्यात तीन हजार ३५० रूग्ण क्षमतेचे पर्यावरणपूरक मनोरूग्णालय
येरवड्यात तीन हजार ३५० रूग्ण क्षमतेचे पर्यावरणपूरक मनोरूग्णालय 
केंद्र सरकारच्या साडेसातशे कोटी रूपये खर्चातून बंगलूरूच्या धर्तीवर रूग्णालय
 येरवडा प्रादेशिक मनोरूग्णालयातील शंभर वर्षांपूर्वीच्या ब्रिटिशकालीन बैठया खोल्या जमिनदोस्त होणार आहेत. त्याजागी सुंदर पर्यावरणपूरक बैठे कक्ष ( वॅार्ड)  बांधण्यात येणार आहेत. भरपूर सुर्यप्रकाश, खेळती हवा असणारे प्रशस्त  कक्ष, प्रत्येक रूग्णाला बेड, व्यायामशाळा, योगा कक्ष,  उद्यान, पदपथ अशी रचना असणार आहे. पुरूष व महिलांसाठी स्वतंत्र कक्ष असून त्या कक्षावर  सौर ऊर्जा रूफ असणार आहे. केंद्र सरकारच्या साडेसातशे कोटी रूपये खर्च करून हे तीन हजार ३५० रूग्ण क्षमतेचे रूग्णालय  बांधण्यात येणार असल्याची माहिती येरवडा प्रादेशिक  मनोरूग्णालयाचे अधिक्षक डॉ. सुनिल पाटील यांनी दिली.
येरवडा मनोरूग्णालयातील रुग्ण संख्या २५४० असून सध्या याठिकाणी नऊशे पुरूष व सहाशे महिला रुग्ण उपचार घेत आहेत. नवीन रूग्णालय  संदर्भात डॉ. पाटील म्हणाले, ‘‘ रुग्णालयातील रुग्णसंख्या पाहता नविन रुग्णालयाची आवश्यकता आहे. ब्रिटीशकालीन शंभर वर्षापूर्वीचे रूग्ण कक्ष आहेत. हे कक्ष जुने झाले आहेत. त्यापैकी अनेक कक्ष मोडकळीस आले आहेत. त्यामुळे नविन रूग्णालयाचा प्रस्ताव होता. केंद्र सरकारने नविन रूग्णालयासाठी साडेसातशे  कोटी रूपयांची तरतूद केली आहे. बंगलूरू येथील निम्हान्स  रूग्णालयाच्या धर्तीवर येरवड्यात रूग्णालय बांधण्यात येणार आहे. सर्व रूग्ण कक्ष बैठी असणार आहेत. यामध्ये पुरूष व महिला कक्ष स्वतंत्र असणार आहेत. सर्व कक्ष पर्यावरणपूरक असून भरपूर सुर्यप्रकाश, खेळती हवा असणार आहे. यासह कक्षाच्या वरती सौरऊर्जेचे पॅनल असणार आहे. “
मनोरूग्णालयात रुग्णाला दाखल केल्यानंतर रुग्णांची मानसिक व शारिरीक चाचणी केली जाते. येथे रुग्णाला शॉक ट्रिटमेंट दिले जाते. त्यापूर्व रुग्णाची रक्त तपासणी,एक्सरे, ईसीजी आदी वैद्यकीय तपासण्या केल्या जातात. त्यानंतरच भुल देऊन शॉक ट्रिटमेंटचा उपचार सुरू करतात. या ठिकाणी प्रत्येकी एक इलेक्ट्रोथेरपीस्ट, भूलतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी आहेत. रुग्णांचा आजार किती दिर्घ आहे, त्यांची शारीरिक व मानसिक स्थितीवरून त्यांना फिट, अशक्त किंवा सर्वसाधारण कक्षात उपचारासाठी ठेवले जाते.  त्यामुळे या ठिकाणी सर्व विभागाचे स्वतंत्र  कक्ष असणार आहेत. येथील कक्ष रुग्णांसाठी सोईचे  व फायद्याचे ठरणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
       “  येरवडा मनोरूग्णालयाला शंभर वर्षापेक्षा अधिककाळ झाले आहे.   यातील अनेक कक्ष मोडकळीस आले आहेत. त्यामुळे ते बंद आहेत. केंद्र सरकारने साडेसातशे कोटी रूपये नविन रूग्णालयासाठी मंजुर झाले आहेत. बंगलूरूच्या निम्हान्सच्या धर्तीवर रूग्णाला केंद्रस्थानी ठेऊन रूग्णालय बांधणार आहे.”
– डॉ. श्रीनिवास कोलाड ,अधिक्षक, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय
फॅमिली वॅार्डसह व्यसनमुक्ती केंद्र 
येरवडा प्रादेशिक मनोरूग्णालयाच्या नविन सोई सुविघांमध्ये फॅमिली वॅार्ड व व्यसनमुक्ती केंद्र सुद्धा असणार आहे. याचे स्वतंत्र कक्ष असणार आहेत. फॅमिली कक्षात रूग्णांसोबर त्यांचे पालक सुद्धा राहू शकतात. त्यामुळे रूग्णाला उपचारासोबतच पालकांचा सहवास मिळाल्यामुळे रूग्ण लवकर बरे होतील असा विश्वास डॅा पाटील व्यक्त केला. तर सध्या व्यसनाधीन रूग्ण मोठ्या प्रमाणात रूग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे अशा रूग्णांवर उपचार स्वतंत्रपणे केले जाणार आहेत. त्यांना मनोरू्ग्णांमध्ये ठेवले जाणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले . 

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...