संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उत्साहात स्वागत

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उत्साहात स्वागत

पिंपरी:  टाळ मृदूंगाच्या लयीत ज्ञानोबा तुकारामाचा गजर करीत पंढरीकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पिंपरी चिंचवड शहरात दिमाखात आगमन झाले. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पालखीचे स्वागत केले.

आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे पिंपरी चिंचवड शहरात भोसरी फाटा, दिघी येथील मॅगझिन चौकात आगमन झाले. यानिमित्ताने पालिकेच्या वतीने मॅगझीन चौक येथे स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. या ठिकाणी आयुक्त शेखर सिंह यांच्यासह पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकाऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरत आनंद साजरा केला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, उप आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, सचिन पवार, सिताराम बहुरे, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, नाना मोरे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक आरोग्याधिकारी राजेश भाट, संतपिठाचे विश्वस्त राजू महाराज ढोरे तसेच विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

स्वागत कक्षामध्ये आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते मानाच्या दिंड्यांना प्रथमोपचार पेटी, देशी वृक्षांच्या बिया, तुळशीचे रोप, संपर्क माहिती पुस्तिका आणि कापडी पिशवी देऊन सन्मान करण्यात आला.

मॅगझिन चौक येथे भाविकांनी तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावर्षीही उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाच्या वतीने पालखी स्वागताच्या ठिकाणी आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली होती . याठिकाणी छायाचित्रे काढण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

दरम्यान, आषाढीवारी निमित्त वृक्षारोपण, हरीतवारी असे विविध उपक्रम देखील महापालिकेच्या वतीने राबविण्यात आले आहेत. स्वागताच्या ठिकाणी महापालिकेच्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभंग गायनाचा कार्यक्रम सादर केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...