ॲानलाईन पेमेंटमुळे  पिक पॅाकिटिंगचे  गुन्हे शून्यावर 

Dilip KurhadeCrimePune10/05/202576 Views

सौजन्य चॅट जीपीटी घिब्ली इमेज प्रातिनिधिक
ॲानलाईन पेमेंटमुळे  पिक पॅाकिटिंगचे  गुन्हे शून्यावर 
वर्षभरात खडकी पोलीस ठाण्यात फक्त  तीन  गुन्हे
पुणे : शहरातील रेल्वे स्टेशन, एसटी स्टॅन्ड, बस थांबे एवढेच नाहीतर सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी पिक पॅाकेटिंगचे गुन्हे हमखास घडणार हे सांगायला भविष्यवेत्त्याची गरज नसायची. मात्र ॲानलाईन ट्राजेक्शन, ॲानलाईन पेमेंटमुळे अनेकजण पैशांचे पाकिट वापरतच नाही. तर अनेकजण रोख रकम बाळगत नाहीत. त्यामुळे पाकिट मारीचे ( पिक पॅाकेटिंगचे) गुन्हे शहरातील अनेक पोलीस ठाण्यात शून्यावर आले आहेत. तर काही पोलीस ठाण्यात अगदी नगण्य गुन्ह्यांची नोंद झाली आहे
पोलीस उपायुक्त परिमंडळ चार मधील चतुःश्रृंगी, विश्रांतवाडी, येरवडा, विमानतळ, चंदननगर आणि लोणीकंद पोलीस अशा सहा ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरात एकही पाकिटमारीचा ( पिक पॅाकिटींगचा) गुन्हा दाखल झाला नाही. तर खडकी पोलीस ठाणाच्या हद्दीत अवघे तीनच पिक पॅाकिटिंगचे गुन्हे दाखल आहे. पुणे शहरातील अनेक पोलीस ठाण्यातील हीच स्थिती आहे. त्यामुळे एका बाजुला ॲानलाईन चे सायबर गुन्ह्यांत वाढ होत असताना परंपरागत काही गुन्हे कालबाह्य होत आहेत.
देशभरात ॲानलाईन ट्रान्जेक्शन किंवा ॲानलाईन पेमेंटमुळे अनेकजण कॅश जवळ बाळगत नाहीत. त्यामुळे पैशांचे पाकिट वापरण्यापेक्षा डिजीटल व्हालेट वापरण्यावर भर आहे. पेटीएम, गुगल पे, फोनपे किंवा युपीआय च्या माध्यमातून खरेदी व विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे कॅशची गरज भासतच नाही. त्यामुळे अनेकांच्या खिशात पैसे नसले तरी मोबाईलच्या माध्यमातून सर्व ॲानलाईन व्यवहार होताना दिसतात. याचा परिणाम पिक पॅाकिटिंगचे गुन्हे शून्यावर आले असल्याचे दिसते.
एका बाजुला काही गुन्हे शून्यावर आले असले तरी सायबर क्राईम सारखे गुन्हे झपाट्याने वाढलेले दिसतात. ॲानलाईन फ्राड, एटीएम पीनच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचे ट्रान्जेक्शन सायबर गुन्हेगार करताना दिसतात. त्यामुळे अशा वाढलेल्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे पोलीसांसमोर मोठे आव्हान असल्याचे दिसते. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर सेल करण्यात आले आहे. सायबर सेल प्रत्येक पोलीस ठाण्यातील स्वतंत्र गुन्ह्यांचा तपास करते. त्यामुळे पोलीस ठाण्यातील काही गुन्ह्याचा आलेख कमी झाले असल्याचे दिसत असले तरी काही गुन्ह्यांचा आलेख वाढलेला दिसत आहे त्यामुळे नागरिकानी समाधान वाटून घेण्याचे काही कारण नाही.
पाकिट वापरण्याचे प्रमाण झाले कमी 
पुर्वी प्रत्येकाच्या विशेषतः पुरूषांच्या पाकिट मध्ये पैशासह एटीएम कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हींग लायन्ससह व्हिजीटिंग कार्ड असायचे. मात्र डिजीटल युगात या सर्वांची जागा डिजीटल व्हालेटने घेतली आहे. त्यामुळे अनेकांनी पाकिट वापरणेच बंद केले आहे. त्यामुळे सहाजिकच पिक पॅाकेटींग करणा-यांची पंचायत झाली आहे. याचा परिणाम त्यांच्या गैरकृत्यांवर होऊन पाकिटमारीचे गुन्हे शून्यावर येण्यास मदत झाली असल्याचे दिसते. 
प्रवासात महिलांची बॅंगतील पैशांची चोरी मोठ्या प्रमाणात
बस, एसटी किंवा रेल्वेच्या प्रवासात महिलांच्या बॅंगेतील पैशांच्पा पाकिटांची चोरी मोठ्या प्रमाणात होते. मात्र या चोरीची वर्गवारी पोलीस ठाण्याच्या गुन्हे यादीत सर्व प्रकारच्या चोरीत केली गेली आहे. त्यामुळे महिलांच्या पर्स मधील पैशांच्या पाकिटाची चोरी झाली तर ती पिक पॅाकिटींग कशी नाही असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे. 

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...