अवघ्या दहा मिनिटात ७५ हजार रुपये मिळाले परत …

Dilip KurhadePuneCrime17/05/2025172 Views

सौजन्य चॅट जीपीटी प्रातिनिधिक चित्र

अवघ्या दहा मिनिटात ७५ हजार रुपये मिळाले परत …
पुणे : एखाद्याच्या बँक खात्यातील पैसे दुसऱ्याच्या खात्यात गेल्यानंतर ते परत मिळवणे फार दिव्य असते. कधी कधी तर हे पैसे परत मिळत नाहीत. त्यामुळे मानसिक व शारीरिक ताण वेगळाच आणि यामध्ये जेष्ठ नागरिक असल्यात सांगता सोय नाही.
एका ज्येष्ठ नागरिकाच्या नजरचुकीने मोबाईलवरून तब्बल 75 हजार रुपये मध्य प्रदेशातील एका व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर झाले. ते पैसे मिळवण्यासाठी जेष्ठ नागरिकांनी विनंती केली असता त्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे जेष्ठ नागरिकाच्या पायाखालची वाळू सरकली. मात्र पोलीसांच्या तात्पर्यतेमुळे अवघ्या दहा मिनिटात पैसे परत मिळाले.
शुक्रवारी सकाळी पावणे नऊ वाजता एका ज्येष्ठ नागरिकांनी घाईगडबडीने आंध्रप्रदेश येतील अनोळखी व्यक्तीच्या मोबाईल नंबर वर तब्बल 75 हजार रुपये ट्रान्सफर केले. ते पैसे परत मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला असता आज्ञात व्यक्तीने टाळताळ केली. त्यामुळे त्यांच्या मुलाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्याकडे धाव घेतली . साळगावकरांनी पोलीस आमदार राहुल बांडे व दीपक शेंडे यांना संबंधित ज्यष्ठ नागरिकाचे पैसे परत मिळवण्यासाठी सूचना दिल्या. त्यानुसार राहुल बांडे व दीपक शेंडे यांनी तात्काळ आंध्र प्रदेशातील व्यक्तीला व्हाट्सअप कॉल करून आपण पोलीस असल्याचे सांगितले. याची खात्री झाल्यानंतर या अज्ञात व्यक्तीने तात्काळ 75 हजार रुपये परत केले. त्यामुळे अवघ्या दहा मिनिटात पैसे परत झाल्याने ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या मुलाने पोलिसांचे आभार मानले.
सदरची कामगिरी पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील , सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर , पोलीस निरीक्षक गुन्हे राहुल कुमार खिलारे, पोलीस अंमलदार राहुल बांडे दीपक शेंडे यांनी केले

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...