मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचे दुजाकीवरून येऊन मंगळसूत्र हिसकावणाऱ्या गुन्हेगारास बारा तासात केले जेरबंद

Dilip KurhadeCityPuneCrime19/05/2025229 Views

मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचे दुजाकीवरून येऊन मंगळसूत्र हिसकावणाऱ्या गुन्हेगारास बारा तासात केले जेरबंद

पुणे : धनकवडी येथील हिल टॉप सोसायटी सिद्धिविनायक मंदिराजवळ एक महिला सकाळी मॉर्निंग वॉक करत होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून तोडून नेले. या अज्ञात चोरट्या विरोधात सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्ह्यात तपास करताना सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील , पोलिस अंमलदार यांनी सुमारे दीडशे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावरून गुन्हा केलेला आरोपी हा स्विगी कंपनीचा डिलिव्हरी बॉय असलेले समजले. या आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार सागर सुतकर, योगेश ढोले यांना आरोपी आंबेगाव पठार येथील गणेश चौक येथे कोणाचे तरी वाट पाहत असल्याचे समजले . त्यानंतर तपास पथकातील पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले . यावेळी आरोपी पळून जाऊ लागला. त्याला पकडून त्याची चौकशी केली. आरोपी अमोल किसन नकाते ( वय 27 रा. आंबेगाव पठार , मूळ रा. मुक्काम पिंपरी, पोस्ट गुंजवणे, तालुका वेल्हा असे असल्याचे समजले. त्याचे अधिक चौकशी केली असता त्याने सहकारनगर येथील पोलीस स्टेशन हद्दीतील महिलेचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र इसका मारून चोरल्याचे सांगितले . आरोपीकडून 90 हजार रुपये किमतीचे दोन तोळे सोने व गुन्हा करतेवेळी वापर केलेली दुचाकी रुपये साठ हजार व सोने गहाण ठेवून मिळालेले एक लाख रुपये असा अडीच लाख रुपये किमतीचा माल जप्त केला गेला. न्यायालयाने आरोपीस मंगळवार तारीख 20 मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे . अधिक तपास सहकारनगरकडील पोलीस निरीक्षक सागर पाटील करीत आहेत.
सदर कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेश विभाग) मनोज पाटील , पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील , सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) सुरेखा चव्हाण, सहकारनगर पोलिसांचे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील , सहाय्यक पोलीस फौजदार बापू खुटवड , पोलीस अंमलदार सागर सुतकर , योगेश ढोले, प्रदीप रेणूसे, महेश भगत, बजरंग पवार, आकाश किर्तीकर , खंडू शिंदे, अमित पदमाळे , मारोती नलावाड यांनी केले आहे

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...