कैद्यांकडून धुलाई !   कपडे धुण्यासाठी कारागृहात अत्याधुनिक लॅान्ड्री मशिन 

कैद्यांकडून धुलाई ! 
 कपडे धुण्यासाठी कारागृहात अत्याधुनिक लॅान्ड्री मशिन 
 कैद्यांनी दिलेल्या इस्त्रीच्या कपड्यांना नागरिकांची पसंती ; आता कपड्यांची धुलाईची सेवा  
पुणे ःयेरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी सुरू केलेल्या इस्त्री विभागाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या विभागात महिन्याला ६४ हजार रूपये निव्वळ नफा मिळत आहे. माफक दर, चांगली व तत्पर सेवा यामुळे परिसरातील नागरिक इस्त्री विभागाच्या सेवेचा फायदा घेत आहे. त्यामुळे आता कारागृह विभागाने लॅान्ड्री मशिन घेतले आहे. त्यामुळे या ठिकाणी अल्पदरात कपडयांची धुलाईची सेवा मिळणार आहे.  कारागृह प्रशासनाने इस्त्री  विभागाचे अत्याधुनिकीकरण केले आहे.  त्यामुळे लवकरच पंचतारांकित हॉटलेस्‌च्या टॉवेल्स, बेडशीटसाठी लॉंंड्रीचीही सेवा देण्यात येण्याची शक्यता आहे. यासाठी सोमवारी सकाळी कारागृह प्रशासनाकडून अत्याधुनिक लॅान्ड्री सेवा सुरू करण्यात आली. ‘ येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या उद्योग विभागातर्फे कर्मचारी वसाहतीच्या परिसरात इस्त्री विभाग सुरू करण्यात आला आहे. कैद्यांची सुधारणा व पुनर्वसन’ अंतर्गत कैद्यांना विविध उद्योगात गुंतविले जाते. त्याचाच भाग म्हणून कारागृहाच्या विक्री केंद्राजवळ ईस्त्री विभाग सुरू करण्यात आला. त्याला नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहून त्यानंतर जेल पोलिस चौकीशेजारी आणखी एक इस्त्री विभाग व केश कर्तनालय सुरू करण्यात आले. इस्त्री विभागात महिन्याला साठ हजार रूपये निव्वळ नफा मिळत आहेत. त्यामुळे यासेवेची वाढती मागणी पाहता आणखी एक इस्त्री विभाग सुरू केला आहे. ’ जेलरोड पोलिस चौकी शेजारी असलेल्या इस्त्री विभागात येरवडा कारागृह कर्मचारी वसाहत, कारागृह मुद्रणालय कर्मचारी वसाहतीसह नागपूरचाळ, हवाईदलातील कर्मचार्ऱ्यापासून ते विश्रांतवाडी , टिंगरेनगर परिसरातील नागरीक मोठ्या प्रमाणात इस्त्री विभागाच्या या सेवेचा फायदा घेत असल्याचे येथील कर्मचा-यांनी सांगितले. तर कारागृह विक्री केंद्राच्या इस्त्री विभागात महिन्याला सरासरी दहा हजार कपडे येत असून त्यातून पन्नास हजार रूपये उत्पन्न मिळत आहे.   कोट “‘ येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या इस्त्री विभागाला वाढता प्रतिसाद पाहून लवकरच अत्याधुनिक लॉंंड्री केंद्र सुरू करण्याचा विचार आहे. त्यामुळे नगररस्ता परिसरातील पंचातारांकित हॉटेल्सचे कपडे सुद्धा धुण्यासाठी येतील असा विश्वास आहे. ’’  – सुनिल ढमाळ , अधिक्षक , येरवडा मध्यवर्ती कारागृह   चौकट  कैद्यांना प्रति दिन ७२ रूपये पगार कैद्यांची सुधारणा व पुनर्वसना अंतर्गत कैद्यांना विविध उद्योगात गुंतवले जाते. इस्त्री विभागात सध्या आठ ते दहाजण काम करीत आहेत. ती क्षमता काही दिवसात बारा कैद्यांपर्यंत जाऊ शकते. इस्त्री विभागात शर्ट किंवा पँटसाठी प्रति नग पाच रूपये तर साडीला पंधरा रूपये दर आकारला जातो. तर कैद्यांना कारागृहाच्या नियमाप्रमाणे ७२ रूपये प्रतिदिन पगार दिला जात असल्याची माहिती येरवडा खुल्या कारागृहाचे अधिक्षक सुनिल ढमाळ यांनी दिली.
 मध्यवर्ती कारागृहाच्या इस्री विभागाला या वर्षी निव्वळ अडीच लाख रूपये फायदा झाला असल्याचे सुनिल ढमाळ यांनी सांगितले. तर खुल्या कारागृह विभागाच्या इस्त्री विभागाला दर महा ३० हजार प्रमाणे तीन लाख ६० हजार रूपये उत्पन्न मिळाल्याचे अनिल खामकर यांनी सांगितले.

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...