व्हिडिओ कॅान्फरन्सच्या माध्यमातून एक लाख ८८४६ बंदी कोर्टात हजर

व्हिडिओ कॅान्फरन्सच्या माध्यमातून एक लाख ८८४६ बंदी कोर्टात हजर
  राज्यातील ३७ कारागृहात व्हिडिओ कॉन्फरन्स उपलब्ध असल्यामुळे वेळेची व मनुष्यबळाची बचत
 
पुणे :  राज्यातील  साठ कारागृहातील क्षमतेपेक्षा अधिक बंदी क्षमता, त्यामध्ये अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे न्यायाधिन बंद्यांना (अंडर ट्रायल) कोर्टात हजर करण्यासाठी तारेवरची  कसरत करावी लागते. कोर्टात घेऊन जाण्यासाठी बंद्यांना बराकीतून बाहेर काढणे सर्व सोपस्कार करून कोर्टपेशी करीता पोलीसांच्या ताब्यात देणे, त्यानंतर बंद्यांना वाहनातून कोर्टात घेऊन जाणे , त्यांना कोर्टात हजर करणे, न्यायालयीन प्रक्रीया संपल्यानंतर परत त्यांना कारागृहात सुरक्षीतपणे घेऊन येणे मोठे जिकीरिचे काम असते. २०२२-२०२३ मध्ये राज्यातील तब्बल एक लाख ८८४६  बंद्यांना व्हिडिओ कॅान्फरन्सच्या माध्यमातून कोर्ट पेशी केल्यामुळे वेळेची व मनुष्यबळाची बचत झाली आहे.  सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाने राज्यातील कारागृहातील बंदीपेशी व्हिडिओ कॅान्फरन्सच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे या व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातूनन गंभीर गुन्ह्यातील खटले तर चालतातच यासह तीन वर्षांच्या आतील शिक्षा झालेल्या कैद्यांना तात्पुरत्या जामिनीवरील निर्णय होतात. राज्यातील ६० कारागृहात चाळीस  हजार कैदी असल्यामुळे कारागृहील कैद्यांचे ‘ओव्हर फ्लो’ काही कमी झाल्याचे दिसून येत नाही. मुंबई , ठाणे, नवी मुंबई, नाशिक, येरवडा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर अशी मध्यवर्ती कारागृह आहेत. तर येरवडा, विसापूर, धुळे, सिंधुदूर्ग, मोर्शी ही खुली कारागृह आहेत. यासह कोल्हापूर, सोलापूर, लातूर, रत्नागिरी अशी जिल्हा कारागृहे आहेत. सुरक्षिततेच्या कारणामुळे कैद्यांना मध्यवर्ती कारागृहात ठेवले जाते. त्यामुळे मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांची संख्या जास्त. या कारागृहात दुप्पटीपेक्षा अधिक कैदी संख्या आहे. मुंबई मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची संख्या ३३० टक्के, सोलापूर जिल्हा कारागृहात ३०६ टक्के आहे. कैदी क्षमतेच्या २०१ ते ३०० टक्के कैद्यांची गर्दी असणारी सहा कारागृहे आहेत. तर १०१ ते २०० टक्के कैद्यांची गर्दी असलेली १७ कारागृहे आहेत. त्यामुळे दररोज शेकडो कैद्यांना कोर्टपेशी करीता घेऊन जाणे अवघड असते. त्यामुळे अशा कैद्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोर्टात हजर करणे सोपे होते. यामुळे वेळेची, मनुष्यबळासह इंधनाची सुद्धा बचत होते.  चौकट बंद्यांची सुरक्षेसह त्यांना पळून जाता येत नाही कोर्टपेशी दरम्यान अनेक कैदी पूर्वी पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेले आहेत. त्यामुळे पोलीसांवर निलंबनाची कारवाई सुद्धा झाल्या आहेत. तर कधी बंद्यांवर कोर्टात हल्ले झाले आहेत. त्यामुळे व्हिडिओ  कॅान्फरन्समुळे बंद्यांची सुरक्षेसह त्यांना पळून जाता येत नाही.
 कारागृहे – बंदीक्षमता -बंदीसंख्या येरवडा – २४४९ – ६५०० मुंबई – ८०४ – २६९८ ठाणे – ११०५ -३३४५ कल्याण – ५४० -१७३९ सोलापूर- १२७ -३८२ बुलेट : मध्यवर्ती कारागृहे – ९ जिल्हा कारागृहे- २८ खुले कारागृहे – १९ विशेष, किशोर सुधारालय, महिला कारागृह, खुली वसाहत प्रत्येकी १

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...