पिंपरी रेल्वेस्थानकाजवळ सापडली नऊ स्फोटकं ; सहा महिन्यांपासून दुर्लक्षित?

पिंपरी रेल्वेस्थानकाजवळ सापडली ९ स्फोटकं ; सहा महिन्यांपासून दुर्लक्षित?*सौजन्य चॅट जिपीटी प्रातिनिधिक चित्र

पिंपरी रेल्वेस्थानकाजवळ सापडली नऊ स्फोटकं ; सहा महिन्यांपासून दुर्लक्षित?

पिंपरी :  पिंपरी रेल्वेस्थानकाजवळ शहराच्या मध्यवस्तीत झाडाझुडपांमध्ये तब्बल नऊ स्फोटकसदृश वस्तू पडून असल्याचे उघडकीस आले.  त्या गेल्या सहा ते सात महिन्यांपासून तेथेच असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

एका जागरूक नागरिकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर, लोहमार्ग पोलीस व बॉम्ब शोध व निकामीकरण पथक घटनास्थळी दाखल झाले. रेल्वेच्या स्थानकाजवळ  चाळ क्र. दोन जवळील झुडपांमध्ये तपासणी केली असता नऊ स्फोटके आढळून आली. या वस्तू निष्क्रिय असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असले तरी, त्या इतक्या कालावधीपर्यंत कोणाच्या लक्षात न येणे ही बाब गंभीर आहे. बॅाम्ब शोधक व निकामीकरण पथक ( बीडीडीएसने)  तत्काळ या वस्तू ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी हलवल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य स्थितीशी या घटनेचा कोणताही संबंध नाही. तरी नागरिकांनी शांतता राखावी, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पिंपरी पोलीस ठाण्याकडून यासंदर्भात पुढील चौकशी सुरू असून, या वस्तू संबंधित ठिकाणी कशा आल्या याचा शोध घेतला जात आहे.

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...