पुणे मेट्रोच्या रामवाडी ते वाघोली आणि वनाज ते चांदणी चौक या उन्नत मार्गिकांना मंजुरी

पुणे मेट्रोच्या रामवाडी ते वाघोली आणि वनाज ते चांदणी चौक या उन्नत मार्गिकांना मंजुरी

पुणे: केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रोच्या वनाज ते चांदणी चौक (मार्गिका २अ) आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (मार्गिका २ब) या महत्त्वाच्या मार्गिकांना मंजुरी दिली आहे. यामुळे पुणे शहरातील नागरिकांना शहराच्या पूर्व – पश्चिम भागात प्रवास करणे आणखी सोयीचे व आरामदायक होणार आहे.
वनाज ते चांदणी चौक (मार्गिका २अ) या विस्तारित मार्गावर २ स्थानके (कोथरूड बस डेपो, चांदणी चौक) असून, त्याची लांबी १.२ किमी असणार आहे. यामुळे वनाज ते चांदणी चौक परिसरातील नागरिकांना मेट्रोची सुविधा उपलब्ध होईल.

रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (मार्गिका २ब) या मार्गावर ११ स्थानके (विमान नगर, सोमनाथ नगर, खराडी बायपास, तुळजाभवानी, उबाळे नगर, अप्पर खराडी रोड, वाघेश्वर मंदिर, वाघोली, सिद्धार्थ नगर, बकोरी फाटा, विठ्ठलवाडी) असतील आणि त्याची लांबी ११.६३ किमी असेल. या विस्ताराने वाघोली आणि विठ्ठलवाडी हा भाग मेट्रोने उर्वरित शहराला जोडला जाणार आहे.

  या दोन्ही उन्नत मार्गिकांची एकूण लांबी १२.७५ किमी असून, यामध्ये १३ नवीन स्थानके जोडली जातील. या संपूर्ण प्रकल्पाचा एकूण खर्च ३६२४.२४ कोटी रुपये   अपेक्षित असून, तो पूर्ण होण्यासाठी अंदाजे ४ वर्षांचा कालावधी लागेल.
या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी म्हटले आहे की, “या दोन्ही मार्गिकांमुळे पुणे शहराचे मोठ्या प्रमाणावर विस्तारित पूर्व व पश्चिम          भाग मेट्रोने उर्वरित शहराशी जोडला जाणार आहे. या भागातील हजारो नागरिकांना याचा फायदा होणार आहे.”

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...