“मध्यम वर्गीय कुटूंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे” – माजी नगरसेवक अनिल (बॉबी) टिंगरे

“मध्यम वर्गीय कुटूंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे”
– माजी नगरसेवक अनिल (बॉबी) टिंगरे

पुणे : धानोरी मुंजाबावस्ती येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या बीजीटी ई-लर्निंग इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करीत आहोत . या शाळेच्या माध्यमातून येथील मध्यम वर्गीय कुटूंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे हा हेतू असल्याचे माजी नगरसेवक अनिल (बॉबी) टिंगरे यांनी सांगितले.

मुंजाबावस्ती येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या बीजीटी ई-लर्निंग इंग्रजी माध्यमाची “शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी आमदार जगदीश मुळीक , माजी नगरसेविका ऐश्वर्या आशुतोष जाधव, बाबुराव टिंगरे, जयेश शेंडकर, विनायक तुम्मा, आशादेवी धुमाळ, अनिता वाघमारे, कपिल राऊत, मुख्याध्यापिका ज्योती दोरगे, अतुल टिंगरे, पूजा धनंजय जाधव, ज्योती सावर्डेकर, विठ्ठल कोथरे, संदीप दांगट, शैलेश रणनवरे, सुभाष पाटील, प्रकाश सुतार, जितेंद्र जगताप, चंद्रकांत जंजिरे, जितेंद्र कराळेकर, चारूदत्त पाटील, कैलास गोसावी, गोपाळ पाटील, स्वप्नील भोसले आदि उपस्थित होते.
माजी नगरसेवक अनिल (बॉबी) टिंगरे यांच्या विकास निधीतून या शाळेचे काम पूर्ण करण्यात आले होते. यानंतर शाळा सुरू करण्याबाबतची संपूर्ण कार्यवाही पूर्ण करत अखेरच्या शाळेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना मुळीक म्हणाले की, ही शाळा सुरु करण्यासाठी मागील अनेक महिन्यांपासून अनिल टिंगरे यांचे प्रयत्न सुरु होते. त्याच्या प्रयत्नांना अखेर यश आलेले दिसून येत आहे.
  पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरु झालेल्या या शाळेत छोटा गट, पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग सुरू झाले असून ही शाळा संपूर्ण इंग्रजी माध्यमाची असणार आहे. पालिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण, गणवेश, वह्या – पुस्तके आदि सर्व सुविधा मोफत पुरविण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाच्या उप प्रशासकीय अधिकारी शुंभागी चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
   

    माजी नगरसेवक अनिल (बॉबी) टिंगरे यांनी शाळेविषयी माहिती देताना सांगितले, की मध्यम वर्गीय कुटूंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे, यासाठी याठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून शाळेच्या इमारतीचे नव्याने काम पूर्ण केले. या इमारतीत शाळा सुरु करण्यासाठी मागील अनेक महिन्यांपासून अनेक तांत्रिक बाबींचा सामना करत प्रयत्न सुरु ठेवले होते, आज ही शाळा सुरु होताना अत्यंत आनंद होत असून मागील अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या या इमारतीत आजपासून विद्यार्थ्यांचा किलबीलाट पाहण्यास मिळणार आहे.

“मुंजाबावस्ती परिसरात पालिकेच्या माध्यमातून सुरु केलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा येथील मध्यमवर्गीय कुटूंबातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ होणार असून शाळा सुरु होण्याबाबतची विद्यार्थ्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे.”
– ज्योती सावर्डेकर, अध्यक्ष बीजेएमसी, महाराष्ट्र प्रदेश

“धानोरी परिसरात पुणे महानगरपालिकेची एकही इंग्रजी माध्यमाची शाळा नसल्याने प्रभागात इंग्रजी माध्यमाचीच शाळा सुरु करण्यात यावी असा आग्रह आम्ही सर्व  नागरिकांनी अनिल दादांकडे केला होता. आमच्या मागणीची योग्य दखल घेत थोडा उशिरा का होईना पण इंग्रजी माध्यमाचीच शाळा सुरु केल्याबद्दल सर्व धानोरीकरांकडून आभार व्यक्त करतो.”
– विठ्ठल कोथरे, सामाजिक कार्यकर्ते

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...