बस मध्ये प्रवाशाचे सोन्याची साखळी चोरणाऱ्यास केले जेरबंद

Dilip KurhadeCrimeCityPune28/05/2025120 Views

सौजन्य चॅट जीपीटी प्रातिनिधिक चित्र

बस मध्ये प्रवाशाचे सोन्याची साखळी चोरणाऱ्यास केले जेर बंद

पुणे : स्वारगेट ते पर्णकुटी चौकादरम्यान बस मधून प्रवास करताना एका जेष्ठ नागरिक प्रवाशाचे सव्वा लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरीला गेली . दरम्यान बस पर्णकुटी चौकीजवळ थांबविण्यात आली. याचवेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी बसमधील प्रवाशांची चौकशी केली . यावेळी सजग असलेल्या पोलिसांनी एका एका प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या . त्याला पकडल्यानंतर त्याच्याकडून सोन्याची साखळी हस्तगत केली. आरोपी सुशांत शंकर गायकवाड ( वय 24 रा साईनाथनगर खराडी) याला पोलीसानी अटक केले.
स्वारगेट ते खराडी दरम्यान बस ने प्रवास करताना एका जेष्ठ नागरिक प्रवाशाचे गळ्यातील तब्बल सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्याची साखळी चोरीला गेल्याचे लक्षात आले . प्रवाशाने बस पोलीस चौकीजवळ घेण्याची विनंती केली . पी एम पी एल बस चालकाने जवळच असलेल्या पर्णकुटी पोलीस चौकी जवळ नेली . यावेळी गस्तीवर असलेल्या पोलीस अंमलदाराने बसमधील प्रवाशांची चौकशी केली. यावेळी एक प्रवासी संशयास्पद हालचाली करताना आढळला. तो पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला पकडले. त्याची सखोल चौकश केल्यानंतर त्याने उडवा उडूवीचे उतारे दिली . पोलीसना त्याच्याजवळ सोन्याची साखळी सापडली. आरोपी सुशांत शंकर गायकवाड ( वय 24 रा. साईनाथनगर खराडी, पुणे ) याला अटक केली असून अधिक तपस पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे करीत आहेत.

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...