येरवडा कारागृहात बायोमॅट्रिक गेट सिस्टीम

Dilip KurhadeCrime30/04/202598 Views

सौजन्य :चाट जीपीटी छायाचित्र प्रातिनिधिक

येरवडा कारागृहात बायोमॅट्रिक गेट सिस्टीम
कारागृह होणार अतिसुरक्षित ;  कैद्यांना एका बराकीतून दुसऱ्या बराकीत  प्रवेश अशक्य

पुणे :  येरवडा  मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासह कैद्यांच्या हाणामारीच्या घटना रोखता येणार आहेत.  येरवडा कारागृहात प्रयोगिक प्रकल्प म्हणून   प्रत्येक बराक आणि सर्कलसाठी ‘बायोमेट्रिक गेट सिस्टीम’ बसविण्यात घेणार आहे. त्यामुळे  कैद्याला एका बराकीतून दुसऱ्या बराकीत प्रवेश करणे अशक्य होणार आहे. अशी यंत्रणा असणारे हे राज्यातील पहिलेच कारागृह ठरणार आहे.
येरवडा मध्यवर्ती कारागृहात तीस बराकींमध्ये २,३२३ कैदी क्षमता आहे. मात्र, याठिकाणी कैद्यांची संख्या ७ हजार पर्यंत जाते. येरवडा कारागृह राज्यातील सर्वाधिक कैदी संख्या असलेले कारागृह आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृह अतिशय सुरक्षित असल्याचे समजले जाते. या कारागृहात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्हा नव्हे तर पश्‍चिम महाराष्ट्रासह नगर जिल्ह्यातील कैदी सुद्धा याठिकाणी ठेवले जातात. त्यामुळे येथे कैदी दाटीवाटीने राहत असल्याचे वास्तव आहे. एका बाजुला एवढी मोठी कैदी संख्या असल्यामुळे कारागृह प्रशासनाला कैद्यांवर नियंत्रण ठेवणे अशक्य होते. कैद्यांमध्ये मारामारी होते. या मध्ये एखाद्या कैद्याचा मृत्यू सुद्धा होतो. त्यासाठी कारागृह प्रशासनाने बायोमॅट्रीक गेट सिस्टीम बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे एकूण कैदी क्षमता २,३२३ आहे. मात्र, कारागृहात तिपटीपेक्षा अधिक कैदी अर्थात ७ हजारा पर्यंत कैद्यांचे वास्तव आहे. कारागृहातील सर्कल एक, तीन आणि टिळक यार्डात प्रत्येकी आठ बराक, सर्कल दोनमध्ये सहा बराक तर किशोर विभागात तीन बराक आहेत. यासह अंडासेल, फाशीची शिक्षा सुनावलेले कैदी, रुग्ण कैदी, ज्येष्ठ नागरिक कैदी, विदेशी कैदी अशा विविध बाराकींमध्ये ठेवले आहेत. यातील जवळपास सत्तर टक्के कच्चे कैदी आहेत. त्यामुळे कच्च्या कैद्यांची संख्या विचारात घेता येरवडा कारागृहातील कैद्यांची नेहमी मारामारी होत असते.
येरवडा मध्यवर्ती कारागृहात ४५ बराक, १३६ विभक्त कोठडी  आणि १४ अतिसुरक्षा विभाग (अंडा सेल) आहेत.  कारागृहात कैद्यांना विविध बराक आणि सर्कलमध्ये ठेवले जाते. जुनी भांडणे, सूड आणि वर्चस्वाच्या कारणावरून एका सर्कल किंवा बराकीत शिक्षा भोगणारे कैदी दुसऱ्या बराकीत जाऊन मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करतात. या घटना टाळण्या करीता   प्रशासनाने कारागृहात प्रत्येक बराक, सर्कल आणि विभक्त कोठडीत ‘बायोमेट्रिक’ या अंर्तभाव असणारी ‘गेट सिस्टीम’ बसविण्याचे काम  युद्ध पातळीवर  हाती घेतले आहे.

कारागृहात ‘ पैनिक अलार्म बटण’
एखाद्या बराक किंवा सर्कलमध्ये कैद्यांची हाणामारी किया काही अनुचित घटना घडल्यास त्याची प्रशासनाला तत्काल माहिती मिळावी, यासाठी ‘पैनिक अलार्म बटण’ बसविण्यात येत आहे. त्यामुळे मोठी अनुचित घटना वेळीच रोखता येणार आहे. याशिवाय कारागृहातील प्रत्येक कैद्याला प्रशासनाची सूचना एकाच वेळी ऐकू येण्यासाठी बराकमध्ये सेंट्रलायझेंशन ध्वनीवर्धक यंत्रणा  लावण्यात येणार आहेत.
  ‘गेट सिस्टीम’ म्हणजे काय ?
गेट सिस्टीम मध्ये सुरक्षा रक्षकांच्या परवानगीनंतरच लोखंडी प्रवेशद्वार उघडल्यावर कैद्याला बाहेर किंवा आत जाता येते. ‘गेट सिस्टीम’ मुळे बराकीत असणाऱ्या कैद्याने ‘बायोमेट्रिक मशिनवर अंगठा दाबल्यावरच त्याला बाहेर जाता आणि आत येता येईल. त्यामुळे बराकीतील अन्य कैद्याला दुसऱ्या बराकीत शिरता येणार नाही.
यंत्रणेची कार्यपद्धती कशी?
बराक, सर्कल आणि विभक्त कोठडीत शिक्षा भोगणा-या प्रत्येक कैद्याच्या अंगठ्याची महिती ‘बायोमेट्रिक मशिन ‘मध्ये नोंदवण्यात येणार. बराक किंवा सर्कलमध्ये आत जाताना किंवा बाहेर येताना गेट सिस्टीम ‘वर अंगठा ठेवावा लागेत, त्यानंतर ये-जा करता येईल.  त्यामुळे इतर बराकीतील कैद्यांना दुसऱ्या बराकीत प्रवेश करता येणार नाही, त्यामुळे मारहाणीच्या घटनांना चाप बसेल. सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांच्या हजेरीची  नोंदही होणार आहे.

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...