येरवडा मध्यवर्ती कारागृह मुलाखत प्रतीक्षालयाचे उद्घाटन

Dilip KurhadePunePrisonCrime20/05/2025280 Views

येरवडा मध्यवर्ती कारागृह मुलाखत प्रतीक्षालयाचे उद्घाटन
पुणे : सायबेज आशा ट्रस्ट,पुणे या कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे बंधांच्या भेटीला येणाऱ्या नातेवाईक वकील यांच्यासाठी सी.एस.आर फंडातून अत्याधुनिक व सर्व सोयी सुविधायुक्त मुलाखत प्रतीक्षालयाचे बांधकाम केले आहे. प्रतीक्षालयाचे उद्घाटन कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, सायबेज सॉफ्टवेअर प्रा.लि.मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण नथानी ,सायबेज सॉफ्टवेअर प्रा.लि. संचालिका रितू नथानी  हस्ते  करण्यात आले.

प्रतीक्षालयामध्ये बंद्याचे नातेवाईक व वकील यांच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, मुलाखत नाव नोंदणी कक्ष, मदत व सहाय्य कक्ष, हिरकणी कक्ष, उपहारगृह, पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कुलर, भेटीस येणाऱ्या बंद्याचे महिला व पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, बंदी भेटीची माहिती देण्यासाठी टीव्ही संच इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सदर अत्याधुनिक प्रतीक्षालयाचा लाभ निश्चितच बंद्याचे च्या नातेवाईक व वकील यांच्यासाठी होणार आहे.  उद्घाटन प्रसंगी  स्वाती साठे  यांनी सायबेज प्रा. लि. यांनी कारागृहासाठी सामाजिक बांधिलकीतून उभारलेल्या मुलाखत प्रतिक्षालय कक्षाच्या बांधकामाचे कौतुक करून आभार व्यक्त केले.  उपक्रमासाठी   अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा डॉ.सुहास वारके  , विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र डॉ. जालिंदर सुपेकर  ,  स्वाती साठे,  यांचे मार्गदर्शन लाभले.
उद्घाटन सोहळ्यास येरवडा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक सुनील एन डमाळ, दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय प्राचार्य नितीन वायचळ, अति.अधिक्षक पी.पी.कदम, उपाधीक्षक डॉ.भाईदास ढोले,   आर ई गायकवाड, वरिष्ठ अधिकारी एस कांदे कर्मचारी उपस्थित होते.

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...