येरवडा प्रिझन प्रेसच्या कर्मचाच्या संख्या झाली २५ टक्के 

Dilip KurhadeMaharashtra30/04/202559 Views

येरवडा प्रिझन प्रेसच्या कर्मचाच्या संख्या झाली २५ टक्के 

  पुणे :ऊर्जा व कामगार मंत्रालयाच्या वतीने राज्यात नऊ शासकीय मुद्रणालय आहेत. यापैकी एक येरवडा कारागृह मुद्रणालय आहे.पण या मुद्रणालय ( प्रिझन प्रेस)च्या कर्मचा-यांची संख्या दहा वर्षांत २५ टक्क्यावर आली आहे. त्यामुळे नियमित प्रसिद्ध होणारे राजपत्र( गॅझेट) , पोस्टल बॅलेट, राज्य सरकारची सर्व स्टेशनरी , विविध प्रकारचे अर्ज, राज्याचे अर्थसंकल्प , सरकारी विविध प्रकाशनांची छपाई होते. मुद्रणालयातील कर्मचारी संख्या कमी झाल्यामुळे ही सर्व कामे कासव गतीने होत आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या उद्योग ऊर्जा व कामगार मंत्रालयच्या अंतर्गत असलेले येरवडा, पुणे येथील फोटोझिंको, मुंबईतील चर्नीरोड, मुंबई, नागपूर येथे दोन मोठी एक लहान अशी तीन मुद्रणालये, कोल्हापूर, वाई  आणि संभाजीनगर ( औरंगाबाद) अशी नऊ मुद्रणालये आहेत. यातील सर्वात मोठे मुद्रणालय म्हणून येरवडा प्रिझन प्रेसची ओळख आहे. या प्रेसमध्ये राज्य सरकारची राजपत्र( गॅझेट) , राज्य सरकारची स्टेशनरी,विविघ प्रकारचे अर्ज, कॅलेंडर, डाय-यांपासून ते पोस्टल बॅलेट पर्यंतची छपाई होते. गेल्या  दहा वर्षां पूर्वी येरवडा  प्रिझन प्रेस मध्ये व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापर, प्लॅनिंग, बायडिंग , मशिन, साख्यिकी पर्यवेक्षक पासून ते यंत्रचालक असे ५६० कर्मचारी होते. यातील सेवानिवृत्तीनंतर अनेक पदे भरलीच गेली नाही. त्यामुळे आता फक्त १४० कर्मचारी उरले आहेत. येरवडा प्रिझन प्रेसमध्ये पंचवीस टक्केच कर्मचारी शिल्लक आहेत. त्यामुळे येथील सर्व कामे कासवगतीने होत आहेत.
दहा ते बारा वर्षापूर्वी केवळ येरवडा प्रिझन प्रेसला वर्षाला दोनशे कोटी रूपयांचा कागद लागत होता. यावरून येथील कामाची कल्पना येते. पूर्वी बल्लारपूर, शिनोली , कोल्हापूर येथील पॅालिग्राफ छपाईयंत्र होते. येथील अधिका-यांनी जर्मनीला खास दौरे काढून जर्मनीची महागडी छपाईची मशनरी आणले. मात्र , यावर चांगल्या दर्जाचे काम होत नसल्याचा आरोप कर्मचारीच करीत आहेत.
    “ येरवडा प्रिझन प्रेस मध्ये मंजूर पदे ४२६ आहेत. सध्या १४७ पदे भरलेली आहेत.  दोन पाळ्यांमध्ये काम सुरू आहे. तांत्रिकपदे भरणे आवश्यक आहेत. वेळेत कामे पूर्ण होत  नाहीत. वेळ वाढवून घ्यावे लागते.”
– संजय आढाव, सहाय्यक व्यवस्थापक
पर्यवेक्षकांची ९० टक्के पदे रिक्त
येरवडा प्रिझन प्रेस मध्ये व्यवस्थापक हेच पद रिक्त आहे. यासह सहाय्यक व्यवस्थापकाची सहा पदे, प्लॅनिंग, बायडिंग, मशिन ॲापरेटर, सांख्यिकी यासह ९० टक्के पर्यक्षकांची पदे रिक्त आहेत. 

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...