रात्री व दिवसा पादचाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीप्रमुखासह साथीदारास अटक

Dilip KurhadePuneCrime17/05/2025130 Views

रात्री व दिवसा पादचाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीप्रमुखासह साथीदारास अटक
पुणे : लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही टोळके रात्री व दिवसा पादचाऱ्यांना लुटत होते. अशा अशा टोळीला लष्कर पोलिसांनी जेरबंद केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आयान फिरदोस पठाण ( वय 18 , रा. गोल्डन हाइट्स , भवानी पेठ व अनिकेत दामू आरणे ( वय २०, रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, भवानी पेठ) हे दिवसा व रात्री पादचारांना हेरून त्यांच्याकडील मोबाईल व रोख रोख रक्कम पळून नेत असत. गुरुवार ( ता. 15 ) फिर्यादी मोबाईल वरील मेसेज वाचत पायी चालले होते. त्यावेळी अज्ञात आरोपींनी त्यांच्याकडील दुचाकीने पाठलाग करून फिर्यादींना ढकलून दिले . त्यानंतर त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेऊन पळून गेले. याबाबतची फिर्याद लष्कर पोलीस स्टेशनमध्ये दाखल होताच पोलिसांनी शोध सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे , शेखर मोकाटे यांना मिळाले माहितीनुसार भवानी पेठ मटण मार्केट जवळ अनिकेत आरणे आणि त्याचे साथीदार आयान पठाण यांनी गुन्हा केले असल्याची माहिती मिळाली. त्यांचा शोध सुरू असताना सीसीटीव्ही फुटेज पडताळणी केली. यावेळी आरोपी दुसाकीवरून ट्रिपल सीट जाताना आढळून आले. त्यांना पोलीस खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्हा केल्याचे सांगितले. आरोपीकडून मोबाईल व नंबर प्लेट नसलेले दुचकी वाहन जप्त केले. आरोपी लष्कर , खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत पादचाऱ्यांना लुटण्याचे प्रकार तपासात निष्पन्न झाले.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गिरीशकुमार देगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे ) प्रदीप पवार, पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे, शेखर मोकाटे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकातील पोलीस आमदार महेश कदम, अतुल मेंगे, संदीप उकिरडे, सोमनाथ बनसोडे, सचिन मांजरे, रमेश चौधरी, सागर हराळ, लोकेश कदम, अमोल कोडीलकर यांनी केले आहे .

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...