लोक वर्गणीतून रस्त्याचे काम ; नागरिकांना वेठीस धरणाऱ्या ठेकेदाराचा निषेध

Dilip KurhadePunePMCCity27/05/2025160 Views

लोक वर्गणीतून रस्त्याचे काम ; नागरिकांना वेठीस धरणाऱ्या ठेकेदाराचा निषेध
वडगावशेरी विधानसभा मतदार संघ काँग्रेस कमिटी*ब्लॉक अध्यक्ष रमेश सकट यांचा पुढाकार

येरवडा : पुणे शहरात सी सी टीव्ही कॅमेरे बसविणायसाठी ऑप्टिकल फायबर केबल जात आहे. शहरात अनेक ठिकाणी ठेकेदारांनी खोदाई करून केबल टाकले मात्र राडारोडा तसेच टाकून ठेवल्यामुळे पादचार्याना य वाहनांना अडचणीचे ठरत आहे. यामुळे अनेक लहान मोठे अपघात होत आहे. असाच प्रकार येरवड्यातील लूप रस्ता आ बी एम कंपनी समो होत होता . ठेकेदारांनी ऑप्टिकल फायबर केबलसाठी खोदाई केली. मात्र रस्ता न करत तसाच ठेवला. त्यामुळे अनेक अपघात होत होते. वडगावशेरी विधानसभा मतदार संघ काँग्रेस कमिटी*ब्लॉक अध्यक्ष रमेश सकट यांचा पुढाकार घेहून लोक वर्गणीतून रस्त्याचे काम केले. नागरिकांना वेठीस धरणाऱ्या ठेकेदाराचा निषेध व्यक्त करण्यात आला.

शास्त्रीनगर चौक ते गोल्फ क्लब चौक दरम्यान असलेल्या लूप रस्त्यावर आ. बी. एम . कंपनी समोर ऑप्टिकल फायबर केबल टाकले गेले. त्यासाठी जयप्रकाशनगर प्रवेशद्वारा जवळ पुणे महानगरपालिकेने ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी साठ ते सत्तर फुट रोडची वीस दिवसापुर्वी खोदाई केली होती. त्याठिकाणी रोडवर पाऊसाने तळे साठून नागरिकांचे दररोज अपघात होऊन ते जखमी झाले. यासह वाहनाचे नुकसान होत होते. त्यामुळे महानगरपालिका पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे त्वरित काम करुन देण्याची मागणी केली. परंतु प्रत्यक्षात वीस दिवस होऊन देखील काम झाले नाही. वडगावशेरी विधानसभा मतदार संघ काँग्रेस कमिटीच्या वतीने *ब्लॉक अध्यक्ष रमेश सकट यांच्या नेतृत्वाखाली लोक वर्गणीतून रस्त्याचे काम करुन राडारोडा उचलण्यात आला. यावेळेस नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पुणे महानगरपालिका प्रशासनाचा आणि वीस दिवस काम न करता नागरिकांना वेठीस धरणाऱ्या ठेकेदाराचा निषेध व्यक्त करण्यात आला.

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...