कल्याणीनगर येथिल निद्रा बॉडी स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसायावर कारवाई

Dilip KurhadePuneCrime17/05/2025356 Views

सौजन्य चॅट जीपीटी घिब्ली प्रातिनिधिक चित्र

कल्याणीनगर येथिल निद्रा बॉडी स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसायावर पोलीसांची कारवाई 

युनिट चार व येरवडा पोलीस ठाणे यांनी संयुक्तिक कारवाई

पुणे : येरवडा कल्याणीनगर येथील निद्रा बॉडी स्पा सेंटरमध्ये युनिट चार व येरवडा पोलीस ठाणे यांनी तेथील वेश्या व्यवसाययावर संयुक्तिक कारवाई केली .अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कायदा अंतर्गत तिघांना  अटक केले असून तीन पीडित महिलांची सुटका केल्याची माहिती येरवडा पोलीस ठाणाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद शेळके यांनी दिली.

याबाबतची माहिती अशी कल्याणीनगर येथिल निद्रा बॉडी स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती युनिट चारला मिळाली होती. शुक्रवारी सायंकाळी येरवडा पोलीस ठाणे व युनिट चारने संयुक्तिक कारवाई केली. यावेळी आरोपी हर्षवर्धन सिंग भारत मोडासीया ( वय 22 वर्षे, रा. लेन 5, रासलेखा बिÏल्डग फ्लॅट नं. 303, कोरेगांव पार्क ) , आसाफुल इस्लाम मुजिबुर रहीमान ( वय 23 वर्षे, रा. कोरेगाव पार्क, मुळ पत्ता- 315, मोदेर टोली रोड, एलपी स्कुलजवळ, बेहलोगुरी, मदरटोली, नागांव आसाम) यांना अटक केले. तर तीन पीडित महिलांची सुटका केली. जुनेद फारुख शेख ( रा. ब्लॉक सेक्टर दर्गा, दईरारोड, बिच गल्ली, अहमदनगर) हा आरोपी फरार आहे. याबाबत पोलीस शिपाई मयुरी राजेंद्र नलावडे यांनी फिर्याद दिली.
या छाप्यात 15,000/- रु. रोख रक्कम, 10,000/- रु. किमतीचा एक मोबाईल व साहित्य जप्त केले आहे. आरोपी पिडीत महिलांना पैशांचे अमिष दाखवुन त्यांचेकडुन वेश्या व्यवसाय करवुन घेत होते. आरोपींवर अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कायदा अंर्तगत गुन्ह्य दाखल केले आहे. अधिक तपस पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) विजय ठाकर करीत आहेत.

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...