डंपरच्या धडकेत महाविद्यालयीन विधार्थीनीचा मृत्यू

Dilip KurhadeEducationCrimePune27/05/2025199 Views

सौजन्य चॅट जिपीटी प्रातिनिधिक चित्र

डंपरच्या धडकेत महाविद्यालयीन विधार्थीनीचा मृत्यू
विश्रांतवाडी – लोहगाव रस्त्यावर सावंत पेट्रोल पंपसमोर घटना
विश्रांतवाडी : विश्रांतवाडी – लोहगाव रस्त्यावर सावंत पेट्रोल पंपसमोर महापालिकेच्या कचरा उचलणारा डंपरला मागून येणाऱ्या दुचाकीची धडक लागल्यामुळे एका महाविद्यालयीन विधार्थीनीचा मृत्यू झाला. एकता भरत पटेल ( वय 23,रा.विद्यानगर लेन नंबर 1 पिंपळे गुरव) असे विद्यार्थिनीचे नाव होते. ट्रक चालक याला ताब्यात घेण्यात आले आहे. प्रथमदर्शी चालक हे मद्यसेवन केले बाबत दिसून येत नाही. तरी देखील त्यांची वैद्य तपासणी केली जाणार असल्याचे विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांनी सांगितले.
महापालिकेचा कचरा उचलणारा डंपर कॉमरझोने रस्त्याकडे जात होता . छत्रपती शाहू महाराज चौक समोरील बाजूस जात होता याच वेळी एक दुचाकी येत होती. यावेळी दुचाकी पाठीमागील चाकाखाली आली. यावेळी एकता भरत पटेल ( वय 23,रा.विद्यानगर लेन नंबर 1 पिंपळे गुरव) हीच मृत्यू झाला. एकता लोहगाव तेथील मराठवाडा मित्र मंडळ येथे शिकत होती. एकता हिचा दुचाकींचा तोल जाऊन सदर अपघातामध्ये तिचे डोक्यावरती ट्रकचे पाठीमागील चाक जाऊन त्या जागेवर मृत्यू झाला .

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...