‘जलाद’ नव्हे ‘हँगमॅन’

सौजन्य चॅट जिपीटी घिब्ली प्रातिनिधिक इमेज

‘जलाद’ नव्हे ‘हँगमॅन’
राज्यातील मध्यवर्ती कारागृहात ‘हँगमॅन’ पदच नाही ; तुरूंग रक्षकावर सोपविली जाते जबाबदारी 

राज्यातील मध्यवर्ती कारागृहात एखाद्या गुन्हेगाराला फासी देणारा ‘ जलाद’ हा शब्दप्रयोग चित्रपट आणि माध्यमांनी रंगविलेला आहे. कारागृहात ‘जलाद ’ हा हे पदच अस्तिवात नाही. त्याऐवजी ‘हँगमॅन’ चे काम एखाद्या कारागृहातील कर्मचाऱ्याला दिले जाते. हा कर्मचारी गुन्हेगाराला फासी देण्या अगोदर दोरखंड तयार करतो. त्यानंतर फासी देणाऱ्या गुन्हेगाराच्या वजनाच्या पुतळ्याला दोरखंडाच्या माध्यमातून फासी देण्याचा सराव करतो. त्यानंतर प्रत्यक्षात गुन्हेगाराला फासी देताना त्याची भूमिका चोख बजावतो. अशा या पडद्या मागील ‘हँगमॅन’ ची गोष्ट

पुणे : देशात पन्नास पेक्षा अधिक कैदी फासीच्या शिक्षेच्या प्रतिक्षेत आहेत. एखाद्या गुन्हेगाराला फासीची शिक्षा सुनावल्यानंतर फासीची अमलबजावणी करण्यापर्यंत बराच कलावधी जातो. यामध्ये गुन्हेगार राष्ट्रपती यांच्याकडे दया याचनेचा अर्ज दाखल करतात. त्यावर राष्ट्रपतीनी हा दया याचनेचा अर्ज फेटाळल्यानंतर फासी देण्याची कार्यवाही सुरू होते. त्यानंतर संबंधित मध्यवर्ती कारागृहातील उंच व सशक्त अशा तुरूंग रक्षकावर ‘हँगमॅन’ची जबाबदारी सोपविली जाते. हा तुरूंग रक्षक एखादे नेमून दिलेल्या कार्याप्रमाणे ( टास्क) जबाबदारी स्विकारतो.
दरम्यान ‘हॅंगमॅन’ कडे संबंधित फासी देण्यात येणाऱ्या गुन्हेगाराची सर्व माहिती येते. त्याचे वजन व उंची किती आहे हे महत्त्वाचे असते. त्याप्रमाणे या हँगमॅन दोरखंड वळायला लागतो. दोरखंड मजबूत होण्यासाठी त्याला तेल लावावे लागते. त्यानंतर फासी देणाऱ्या गुन्हेगाराच्या वजन व उंचीच्या धातूचा पुतळा बनविला जाते. हा पुतळा घेऊन फासीच्या खोलीत हा हँगमॅन त्यावर सराव करतो. एकाच खटक्यात गुन्हेगाराला फासी लागणे आवश्‍यक असते. त्यासाठी तो अधून मधून सराव करत असतो.

कार्यवाहीत ‘हँगमॅन’ची मानसिक स्थिती बदलते
हँगमॅनची भूमिका बजावताना त्याची मानसिक स्थिती बदलत असते. त्यासाठी मध्यवर्ती कारागृहात असणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञांमार्फत त्याचे वेळोवेळी समुपदेश केले जाते. काही एखाद्या वेळेस दहशतवाद्याला फासी दिली असल्याचे हँगमॅनचे नाव गोपनीय ठेवले जाते. एकदा फासी देण्याचे काम झाले कि तुरूंग रक्षक आपल्या नेहमीच्या कामावर रूजू होतो. केरळ सारख्या राज्यात हँगमॅनला दोन लाख रूपयांचे बक्षिस राज्य सरकारकडून दिले जाते. या स्वरूपाचे बक्षिस महाराष्ट्रात दिले जात नाही. पण विशेष सेवा पुरस्कार किंवा काही रोख रक्कम बक्षिस म्हणून दिले जाते.
सध्या येरवडा महिला कारागृहात पाच मुलांचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या सीमा गावित आणि रेणुका शिंदे या बहिणी फाशीच्या प्रतीक्षेत आहेत कारण त्यांच्या क्षमा याचिकेवर निर्णय होण्याची प्रतीक्षा आहे.
येरवडा मध्यवर्ती कारागृहात फाशीची शिक्षा झालेल्या काही दोषींमध्ये कसाब, जिंदा-सुखा आणि अभ्यंकर-जोशी हत्याकांडातील चार तरुण होते. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य हल्लेखोर अजमल कसाब याला २१ नोव्हेंबर २०१७ रोजी येरवडा मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आलेली शेवटची व्यक्ती होती. यापूर्वी ऑपरेशन ब्लू स्टारचे नेतृत्व करणारे माजी लष्करप्रमुख दिवंगत जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेले खलिस्तानी दहशतवादी जोडी जिंदा आणि सुखा यांना सुद्धा येरवडा मध्यवर्ती कारागृहात फासी देण्यात आली होती.

               ‘‘ जलाद हा शब्दप्रयोग फक्त चित्रपट आणि माध्यमांनी रंगविलेला आहे. प्रत्यक्षात जलाद हा राज्यातीलच नव्हे तर देशाच्या कोणत्याच कारागृहात नाही. फासी देण्यासाठी कारागृहातीलच एखाद्या सशक्त अशा तुरूंग रक्षकाला काम दिले जाते. त्यासाठी त्याकडून साराव करून घेतला जातो. त्याचे एखाद्या गुन्हेगाराला फासी देण्याचे कार्य संपताच तो नेहमी प्रमाणे दैनंदिन कामाला लागतो.’’
                   – योगेश देसाई, कारागृह उपमहानिरीक्षक

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...