जास्त पैशाचे आमिष देऊन ज्येष्ठ नागरिकांची तब्बल 40 लाख रुपयाची फसवणूक

जास्त पैशाचे आमिष देऊन ज्येष्ठ नागरिकांची तब्बल 40 लाख रुपयाची फसवणूक
दिघी पोलीस ठाणे हद्दीतील प्रकार ; माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला
दिघी : दिघी पोलीस स्टेशन हद्दीत एका ज्येष्ठ नागरिकाला जास्त पैशाची आमिष देऊन एका मोबाईल ॲप कंपनीने तब्बल 40 लाख रुपयाची फसवणूक केली. गुन्हा दिघ पोलीस स्टेशन दाखल झाला आहे. पोलिसानी एफ एक्स रोड ट्रेडिंग कंपनी चे चालक ,टेलिग्राम ग्रुपचे ॲडमिन मोबाईल वर कॉल करणारी व्यक्ती, पैसे पाठवले बँक खातेधारक यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एफ एक्स रोड ट्रेडिंग कंपनी चे एप्लीकेशन फेसबुक वर लिंक करून डाऊन केल्यानंतर एका ज्येष्ठ नागरिकाला वेळोवेळी विविध बँक खातात पैसे पाठविण्यास सांगितले. या ॲप्लिकेशन वर फिर्यादी यांना पैसे वाढलेले दिसत होते. मात्र ते काढता येत नव्हते . याबाबत त्यांनी एफ एक्स रोड कंपनीचे यशोदा यांना पैसे परत मिळत नसल्याचे सांगितले. यशोदा यांनी त्यांना परत पैसे पाठवण्यास सांगितले. त्यांनी ट्रेडिंग कंपनीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता एरर आला. जेष्ठ नागरिकाने तब्बल 39 लाख 83 हजार 730 रुपये गुंतवले होते. मात्र त्यातील एक रुपया सुद्धा त्यांना परत मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी दिघी पोलीस स्टेशन गाठले . तेथे आपली तक्रार दिली. ज्येष्ठ नागरिकांनी रोड ट्रेडिंग चालक टेलिग्राम, ग्रुपचे ॲडमिन, मोबाईल वर कॉल करणारी व्यक्ती, पैसे पाठवले बँक खातेधारक यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
दिघी पोलीस स्टेशन माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक गुन्हे पाटील करीत आहेत.

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...