महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी व उद्योजकांनी एआयद्वारे श्रीमंत व्हावे- डॉ हितेश शुक्ला

Dilip KurhadeEducationNashik19/05/2025397 Views

महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी व उद्योजकांनी एआयद्वारे श्रीमंत व्हावे: डॉ हितेश शुक्ला

कृत्रिम बुद्धिमत्ता ही काळाची : आयएमआरटी एआय राष्ट्रीय परिषदेचा सूर

नाशिक:  नाशिकचा कांदा ७५० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार करून गुजरातमधील महुआ येथे पोहोचतो. तिथे तो मोठा वाहतूक खर्च सहन करून ड्रायरमध्ये कोरडा केला जातो. कांद्याची भुकटी आखाती देशांत १०० पट किंवा त्याहून अधिक दराने निर्यात केली जाते. यातून गुजरात प्रचंड नफा कमावते. महाराष्ट्रातील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना नैतिक मार्गाने श्रीमंत बनविण्याचा दृष्टिकोन का विकसित केला नाही? विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांनी यासाठी अभ्यासक्रम का विकसित केले नाहीत? त्यासाठी सर्वच प्राध्यापकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता व शिकण्याची तयारी ठेवायला हवी व त्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांनी उज्वल भविष्यासाठी करावा. तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. आयएमआरटी एआय राष्ट्रीय परिषदेत असे सुचवले की “कृत्रिम बुद्धिमत्ता हे सर्व शैक्षणिक संस्थांनी समाविष्ट करावा याचा वापर करून जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या व्यवसायात संधी निर्माण होतील” असे सौराष्ट्र विद्यापीठाचे डीन डॉ. हितेश शुक्ला यांनी प्रतिपादन केले. मविप्र संस्थेच्या आयएमआरटी आणि एआयएमएस यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय परिषद आयोजित झाली. ही दोन दिवसीय ९ वी राष्ट्रीय परिषद गंगापूर रोडवरील आयएमआरटी महाविद्यालयात झाली. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ विषयावरील या परिषदेच्या समारोप भाषणात डॉ. शुक्ला प्रमुख वक्ते होते. व्यवसाय सुरू करून नफा मिळविण्यासाठी त्यांनी एआयच्या वापरासह अनेक युक्त्या सांगितल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना मविप्र उपसभापती डी. बी. मोगल यांनी “शेतीतील मजूरांची कमतरता व इतर समस्या दूर करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मजुरांप्रमाणे काम करणारे रोबोट्स किंवा तंत्रज्ञ विकसित करून शेतकऱ्यांवरील भार कमी करण्यासाठी मुलांनी व प्राध्यापकांनी संशोधन करून योग्य तो समाजासाठी हातभार लावावा” असे मत मांडले.

प्रास्ताविकात डॉ. प्रशांत सुर्यवंशी यांनी बदलत्या काळानुसार एआयचे महत्त्व सांगितले. त्यांनी राष्ट्रीय परिषदेचे महत्त्व आणि नवीन अभ्यासक्रमांची माहितीही दिली.

एआय वरील दोन दिवसातील आठ सत्रातील निष्कर्ष अहवालवाचन संयोजक डॉ. संजय आ. गायकवाड यांनी केले.

केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एस काळे यांनी एआयचा प्रत्यक्ष वापर समाज व राष्ट्राच्या कृषी विकासासाठी किती गरजेचा आहे हे सांगितले.

या परिषदेत देशभरातील तज्ज्ञ, व्यावसायिक, उद्योजक, पत्रकार आणि मान्यवर सहभागी झाले व विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. याबद्दल मविप्र संचालक अॅड. लक्ष्मण लांडगे यांनी आयएमआरटीच्या राष्ट्रीय परिषद आयोजनाबद्दल गौरवोद्गार काढले.

सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. हर्षल देशमुख यांनी मानले.

दुसऱ्या दिवसाची प्रथम सत्राची पेरणी  विश्वास देवकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेची सांगड मानवी मनावर त्याचे होणारे परिणाम व त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या यावरती मार्गदर्शन केले. त्यामध्ये चर्चेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी मनावर ती राज्य करू शकणार नाही परंतु काही प्रमाणामध्ये मानवी भावनांमध्ये हस्तक्षेप करू शकेल असे म्हटले.

परिषद यशस्वी होण्यासाठी डॉ. जयश्री कदम, डॉ. दीपक नांद्रे, डॉ. प्रवीण रायते, वैशाली कदम, प्रा राहुल ठाकरे, डॉ जी. एम अहीरे‌ व डॉ वर्षा भाबड, प्रा. सीमा जाधव व प्रा राजश्री वडघुले यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांचे सूत्रसंचालन केले. धोंडगे, चेतन मिस्त्री, अविनाश आमले, खुशबू कुवर, प्रणव ठाकरे, अस्मिता कुवर, सार्थक आवारे आदींनी परिश्रम घेतले.*एआय वरील अभिनव संशोधनाचा गौरव*

परीषदेत सादर झालेल्या एआय वरील अभिनव संशोधनाचा गौरव यावेळी केला गेला. प्रा. किरणकुमार जोहरे यांच्या ‘कृत्रिम बुद्धिमत्ता@2047: भारताचा प्रवास 50 ट्रिलीयन (लाख कोटी)डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने सक्षम प्रवास’ या रिसर्च पेपरला प्रथम क्रमांकाचा ‘बेस्ट इनोवेटिव रिसर्च पेपर प्रेझेंटेशन अवार्ड’ प्राध्यापक वर्गातून एकंदर ५० पेपर्स मधून दिला गेला. रिसर्च फेलो वर्गात श्रीमती मिनू सेठी यांच्या ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा कामात प्रवेश व जीवन संतुलन, एकीकरणावर होणारा परिणाम’ तर विद्यार्थी वर्गात ‘आरोग्य क्षेत्रात एआय सोल्युशन्सच्या विकासाला बिग डेटा ॲनालिटिक्समुळे चालना’ या एमआयटी व्हीपीयू सोलापूर येथील वैश्नवी सोमनाथ, समृद्धी सोमनाथ, दिशा महाजन, सुयश गायकवाड आणि अतुल बंगरी यांच्या रिसर्च पेपरला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

परीक्षक म्हणून डॉ बी जी वाघ (मविप्र माजी प्राचार्य), डॉ डी बी शिंदे (संचालक महात्मा गांधी विद्यामंदिरचे व्यवस्थापन आणि संशोधन संस्था) डॉ श्रीराम झाडे (विभागप्रमुख, डॉ. मूंजे व्यवस्थापन आणि संगणक अभ्यास संस्था) डॉ राहूल पाटील (प्राचार्य, मविप्र सातपूर कॉलेज), डॉ. सुवर्णा शिंदे (संचालक, नवजीवन व्यवस्थापन संस्था), डॉ. जयश्री भालेराव (प्राध्यापक, महात्मा गांधी विद्या मंदिर पंचवटी व्यवस्थापन आणि संगणक विज्ञान महाविद्यालय), डॉ. सोनाली पाटील (विभाग प्रमुख, एमबीए, पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय), डॉ. योगेश गायकवाड (सहयोगी प्राध्यापक, मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट अंतर्गत अंतर्भूत आणि इमारत डिझाइन विभाग) या आठ दिग्गज व्यक्तींच्या पॅनलने कसून तपासणी करीत व प्रश्नांचा भडीमार करीत कसोशीने विजेत्या रिसर्च पेपरची एआय वरील अभिनव संशोधन म्हणून निवड केली.

 

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...