राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोहेगावचे प्राचार्य डॉ. काशिनाथ एच. मुंडे यांना “प्राचार्य गौरव पुरस्कार”

राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोहेगावचे प्राचार्य डॉ. काशिनाथ एच. मुंडे यांना “प्राचार्य गौरव पुरस्कार”

पुणे  :लोहेगाव येथील के.ई. सोसायटीच्या राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक),  प्राचार्य डॉ. काशिनाथ एच. मुंडे यांना “प्राचार्य ऑफ द इयर फॉर इन्स्टिट्युशनल एक्सलन्स” हा राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आला आहे.हा पुरस्कार ८ व्या हायर एज्युकेशन इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी समिट अँड अवॉर्ड्स या कार्यक्रमात देण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन प्लस नाईन वन मीडिया तर्फे पुणे येथे करण्यात आले होते.या पुरस्काराचा उद्देश शिक्षण संस्थांमध्ये उत्कृष्ट व्यवस्थापन, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्राचार्यांच्या योगदानाचा गौरव करणे आहे. डॉ. मुंडे यांनी गेल्या काही वर्षांत तंत्रशिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला.

पुरस्कार प्रदान करताना प्लस ९१ मीडिया चे संस्थापक संदीप गुलाटी व सहसंस्थापक अशुतोष दुबे उपस्थित होते.

राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संपूर्ण टीमकडून डॉ. मुंडे यांचे अभिनंदन करण्यात येत असून, हा पुरस्कार संस्थेच्या प्रगतीचा आणि गुणवत्तेचा मानबिंदू ठरत आहे.याप्रसंगी कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे मार्गदर्शक प्रतिक  जयंत पाटील आणि संस्थेचे सचिव  आर .डी. सावंत  यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...