पक्षात फक्त पाच दिवसच होतो….

पक्षात फक्त पाच दिवसच होतो….
विधानसभा किंवा महापालिकेच्या निवडणूका आल्या की नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा विविध राजकीय पक्षातून बाहेर पडणे व प्रवेश करणे ठरलेले असते. यामध्ये तर अनेक नेते व कार्यकर्ते हुशार असतात. राजकीय पक्षाची हवा बघून अवघ्या चार ते पाच दिवसांवर आलेल्या निवडणूकी पूर्वी पक्षात प्रवेश करणारे पण बहाद्दर आहेत. निवडणुका झाल्यानंतर विजयी झालेल्या नेत्यांकडे अशा कुंपणावर असणाऱ्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची यादी येते. त्यांना धडा शिकविण्यासाठी संबंधीत नेते त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. अस्वस्थ झालेले कार्यकर्ते असो कि नेते संबंधित नेत्याला पक्षात घेण्यासाठी विनवणी करतात. मी कुठे पक्ष सोडला होता, फक्त शेवटचे पाच दिवस विरोधी पक्षाचे चिन्ह असलेले उपरणे, झेंडा घेऊन फिरलो. निवडणूकीच्या दिवशी फक्त त्यांच्या बुथवर बसलो होतो, अशी कारणे सांगताच कार्यकर्त्यांमध्ये एकच हसा पिकतो.

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...