बबल’ च्या जाळ्यातून सुटका अवघड

बबल’ च्या जाळ्यातून सुटका अवघड
कोरोना काळातील ही घटना आहे. भारत विरूद्ध इंग्लड ची एक दिवशीय मालिका पुण्यात होते. त्यामुळे दोन्ही देशांच्या खेळाडूंचा मुक्काम पुण्यातील एका हॉटेल मध्ये होता. तेथे त्यांना ‘जैवसुरक्षा’ होती. या हॉटेलमध्ये रचना अशी होती कि खेळाडू त्यांचे क्रू मेंबर हे एकदा आत गेले कि त्यांना परत बाहेर येणे अशक्य होते. त्यांना जाण्यासाठी असलेल्या लिफ्ट मधून खोलीत गेले कि इतरांना कोणाला तेथे जाता येत नाही किंवा एकदा आत गेल्यावर त्यांना बाहेर पडणे अशक्य होते. कोणी जरी चुकून बाहेर पडल्यास त्यांना पुन्हा आत जाणे अशक्य होते. तसेच बाहेर चोवीस तास पोलिसांचा कडक पहारा असायचा. तरी सुद्धा एक खेळाडू खोलीच्या दरवाजात अडथळ्यासाठी वस्तू ठेऊन बाहेर आला. मात्र बाहेर मोठ्या मिशीवाल्या पोलिसाला बघून तो त्याच पावलाने परत खोलीत गेला. ही बाब सीसीटीव्हीत उघड झाल्याने संबंधित खेळाडूला समज देण्यात आली होती. मात्र आता ही स्थिती नसल्यामुळे खेळाडू नक्कीच मुक्तसंचार करीत असतील यात शंकाच नाही. तरी सुद्धा सुरक्षेसाठी काही शिस्त व नियम असतात हे वेगळे सांगायला नको.

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...