टेली कॉलरची अशी ही फिरकी

टेली कॉलरची अशी ही फिरकी
विविध वित्तीय संस्था, बँकांच्या कॉल सेंटरमधून सतत फोन येत असतात. कर्ज पाहिजे का ? किंवा गुंतवणूक करायची आहे का ? अशी विचारणा कॉल सेंटरमधून होत असते. यावर अनेकजण टाईमपास म्हणून टेली कॉलरची फिरकी घेताना दिसतात. तर काहीजण नम्रपणे नको म्हणून सांगतात. तर सततच्या या टेली कॉलरच्या फोनला कंटाळलेल्या पूर्व भागातील नगरसेवकाने चांगलीच युक्ती शोधून काढली आहे. कॉलरचा कर्जासाठी फोन आल्यास ते तीन ते चार कोटी रूपये गुंतवणार असून चांगला प्लॅन सांगा अशी विचारणा करतात. तर ‘गुंतवणूक करायची’ का असा फोन आल्यास ते अमूक कोटी रूपये कर्ज हवे असल्याचे सांगतात. त्यामुळे अचानक आलेल्या प्रश्‍नामुळे समोरील कॉलर गोंधळतो. कॉलरच्या झालेल्या गंमतीने नगरसेवक महाशय मनोमन आनंदीत होतात.

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...