जॉय ऑफ राईड

जॉय ऑफ राईड

शहराच्या पश्‍चिमेकडील उपनगरातील वराला पुर्वेकडे असलेल्या वधुला मागणी घालण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरने जाण्याची इच्छा होती. त्यासाठी तीन ते पाच लाख रूपये मोजण्याची सुद्धा वराच्या पालकांनी तयारी दर्शविली. त्यानंतर संबंधित कंपनीची शोधा शोध सुरू झाली. त्यांच्या ओळखीच्या एका राजकीय नेत्याला ही गोष्ट समजली. त्यांनी संबंधित कंपनीकडे चौकशी केल्यावर त्यांनी १ तासाचे भाडे सांगितले. मात्र वराला शहराच्या पश्‍चिमेकडून पूर्वेकडे येण्यासाठी हेलिकॉप्टरने अवघी काही मिनिटे लागणार होती. ही संधी ओळखत नेत्याने संबंधित कंपनीला अर्धातास स्वत:ला शहराच्या भोवती ‘जॉय ऑफ राईड ’ मारण्याची इच्छा दर्शविली. कंपनीला ऑर्डर मिळवून दिलेल्या नेत्याला सुद्धा नाही म्हणता आले. त्यामुळे नेत्याने शहरावरून फेरफटका मारल्यानंतर वराला हेलिकॉप्टर दिले. त्यामुळे पुढारी असो की कोणीही कधी आणि कशी संधी साधतील हे सांगता येणे कठिण आहे.

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...