हवा भरण्याच्या यंत्रावर काही पण ?

हवा भरण्याच्या यंत्रावर काही पण ?
राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नेत्याकडून आपले काम करून घेण्यासाठी कशी युक्ती करतात याची प्रचिती नुकतीच आली. शहरातील एका आमदाराचा कार्यकर्ता त्यांना मोटारीच्या चाकात हवा भरण्याचे यंत्र भेट देतो. त्यामुळे आमदार खुष होतात. मात्र त्यांचा आनंद फार काळ टिकत नाही. कारण भेट दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी कार्यकर्ता आमदारांच्या कार्यालात हजर होतो. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर कार्यकर्ता आमदार साहेबांना हळूच एक काम असल्याचे सांगतात. संबंधित कामासाठी कार्यकर्त्याला तीस ते चाळीस हजार रूपये मोजावे लागणार होते. आमदारांनी सांगितल्यास ते काम मोफत होईल, असे कार्यकर्ता सांगू लागतो. यावर क्षणाचा ही विलंब न लावता आमदार साहेब कार्यकर्त्याला त्यासाठी तू हवा भरण्याचे यंत्र भेट दिले का, अशी विचारणा करताच कार्यकर्त्याचा चेहरा बघण्यासारखा होता.

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...